Posts

Showing posts from December, 2009

पुन्हा आत्महत्या

Image
आज पुन्हा एक आत्महत्या. शाळकरी मुलाने अभ्यासाच्या तनावाखाली येऊन गळफ़ास घेऊन जीव दिला.रोज रोज हेच चालले आहे. अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा...आणि शेवटी अंत. ह्याला जबाबदार कोण? आजची शिक्षणपद्धती, मुलांचे पालक, आजु बाजुची परिस्थिती कि मुले स्वत: ? विषय तसा फ़ारच गंभीर आणि विचार करण्याजोगा आहे. हे असे का घडते? का म्हणून हि मुले अभ्यासाच्या तनावामुळे जीव देण्यापर्यंत पाऊल उचलण्याचे धाडस करतात ? शाळेत तर आपण सर्वच जातो, सर्वजण हया अभ्यास आणि परीक्षेच्या चक्रातुन आपल्या योग्यतेनुसार बाहेर पडतात. कुणी जेमतेम पास होतात, कुणी बर्‍यापैकी मार्क्स मिळवतात तर कुणी मेरिटलिस्ट मध्येही नाव नोंदवतात, पण यश-अपयशाची व्याख्या सर्वत्र सारखी असतेच असे नाही. नापास होणारी मुले जिथे आत्महत्या करतात तेच मेरिटलिस्ट मध्ये न आल्याने निराश होणारे ही करतात. याउलट रिझल्टच्या टेन्शनमुळे त्याला सामोरे न जाण्याच्या भीतिने ही काहीजण या अनमोल जीवनास गमावुन बसतात. मग या सर्वावर उपाय काय? या सर्व परिस्थितीत त्या मुलांच्या मनाचा विचार करण्याचीही फ़ार आवश्यकता आहे आणि हे सर्व घडण्यामागे एक कारण प्रकर्षाने जाणवते