Posts

Showing posts from 2010

पहिला वाढदिवस

Image
मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.
शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो.
१८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
काहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत चाल…

दिवाळी-कालची आणि आजची...

Image
सर्वप्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
दिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.
तेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्…

गणेश विसर्जन सोहळा

गणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्‍या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल.
गेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आ…

खो-बाई-खो

मिळाला एकदाचा खो! गेल्या आठवड्यात सुहासने खो दिला आणि मग 'आलिया भोगासी असावे सादर' प्रमाणे ही पोस्ट करायची वेळ आली. सर्वप्रथम ब्लॉग विश्वात हे खो-खो चे प्रकार चालू झाले तेव्हा वाटले की आपण काही या जाळ्यात अडकणार नाही पण खो-खो ची साथ वेगाने पसरत चालली आहे आणि जो तो आपला खोकत बसलाय.
अनुवादासाठी मी कोणते गाणे निवडावे हा एक मोठा प्रश्न पडला होता...बरीच उलथापालथ केल्यानंतर एक गाणे निवडले जे माझे खूप आवडते आहे. 'प्यार का मौसम' या चित्रपटातील 'तुम बिन जाऊ कहाँ'. हे गाणे किशोरदा आणि रफीसाहेब दोघांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे आणि वेगवेगळ्या कडव्यांसह रेकॉर्ड झाले आहे.
अनुवाद करायचा असला तरी अगदी शब्द:शह अनुवाद न करता तो अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा या प्रयत्नास नक्की प्रतिसाद द्या.
एक विनंती अशी की कृपया गाण्याच्या मूळ चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा सुचेल त्या चालीवर गा.

मूळ गीत-

मोहम्मद रफ़ी-

तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके
कुछ ना फिर चाहा कभी तुमको चाहके, तुम बिन ..

देखो मुझे सर से कदम तक, सिर्फ़ प्यार हूँ मैं
गले…

कार्टून नेटवर्क-रिलोडेड

Image
माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया.

कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी'. गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत.'…

निषेध!निषेध!!

Image
निषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम! आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्‍या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्‍या, न रुचणार्‍या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) -

१.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्‍या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण इ…

सैनिकहो तुमच्यासाठी...

Image
भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...
गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील काही ओळी अशा...

परि आठव येता तुमचा... आतडे तुटतसे पोटी... खरंच तुटते का?
आशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही.
माफ करा आम्हाला,
कारण स्वातंत्र्यदिन साजरा करावा असे…

रक्तरंजीत पुस्तक

नुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये.
सचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस !
एरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे …

वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)

Image
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते)


आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता कपूरच…

समानतेचा निकष

आपल्या देशात नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवयच लागली आहे. एस.एस.सी.बोर्डाचे निकाल लागले आणि यंदा अपेक्षेहून अधिक मार्कांची उधळपट्टी झाली. मुले टेन्शन घेतात, आत्महत्या करतात म्हणून सढळ हाताने गुणवाटप करण्यात आले. सर्वत्र आनंदी-आनंद झाला.
आता महत्वाचे काम- मिशन अड्मिशन. आणि अकरावी प्रवेशासाठी एस.एस.सी. बोर्डाप्रमाणे, सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. बोर्ड ही रांगेत उभे राहीले. दरवर्षी प्रमाणे इतर बोर्डाचे विद्यार्थी रांगेत पुढे आणि आपले मराठमोळे विद्यार्थी मागे!. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का? या एस.एस.सी. बोर्डाच्या प्रश्नावर शिक्षणखात्यास आणि हायकोर्टास अजूनही उत्तर सापडले नाही. या पूर्वी ही पर्सेन्टाईल आणि ९०:१० हे फॉर्म्युले वापरण्यात आले पण कोडे अजुन सुटले नाहीए. हायकोर्टाने मात्र हॅटट्रिक साधत या वर्षीही नापास होण्याचे सत्र चालू ठेवले.
एस.एस.सी. आणि इतर बोर्डांची गुणांच्या बाबतीत अशी तुलना करणे योग्य नाहीच आहे. दोन्हींचे अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत वेगवेगळी अड्मिशन प्रक्रिया अवलंबण्याची गरज आहे. त्यावर कधी न कधी योग्य उपाय सापडेल अशी आशा…

परीक्षा संपली !!!

Image
हुश्श ! संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ! ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो.
मला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय ! म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच ! कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कध…

सानियाच्या लग्नाला

Image
हो-नाही म्हणता म्हणता अखेर सानियाचे लग्न झाले आणि ते ही शोएबशीच झाले. बाकी सर्व न्युज चॅनेल्सनी, वर्तमानपत्रांनी आणि तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनीही तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाह करण्याचा शक्यतोवर, शक्यतोपरी निषेध केला पण अखेर नदी सागरास मिळाली. ती भारतीय सागरास न मिळता पाकिस्तानाकडे वळली याचेच तमाम भारतीयांना दु:ख. तर तिकडे पत्रकार आणि बातमीदारानी या एका बातमीचा उदो-उदो करीत टीआरपी खायला सुरूवात केली.
एकीकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याचे उपदेश पाजतो आणि तेच अगदी सहजपणे विसरूनही जातो. सानिया मिर्जा मोठी टेनिसपटू म्हणून तिच्या लग्नाचा एवढा गाजावाजा. तिने कुणाशी लग्न करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण सारे तिच्यावर हक्क गाजवल्याप्रमाणे तिच्या लग्नाच्या विरोधात उभे. आपल्याला कुणी हक्क दिला ? ती भारतासाठी खेळते, टेनिसमध्ये भारताला नावलौकिक मिळवून देते म्हणून का? आणि मुळात एवढी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीच जर तिचे लग्न शोएबशी झाले असते तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता. तिने शोएबशी लग्न करो वा शाहीदशी करो पण न्युजवाल्यांना निमित्तच हवे असते- ब्रेकिंग न्युज!' मग तिच्या घरातले आई-वडील …

वेळ न उरला हाती...

Image
वेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून वेळेचा अपव्यय करत राहतो आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा बोलतो.''अरे वेळच नाहीए रे...!''
खरं तर एवढ्या दिवसांनी ही पोस्ट आली यावरून तुम्ही ओळखले असेलच की माझ्याकडे वेळ किती कमी आहे ( म्हणजे फिल्मी स्टाइलने म्हणत नाहीए...पण माझ्या विचारांच्या मौलिक संशोधनातून( किंवा मौलिक विचारांच्या संशोधनातून) मला कळून चुकले आहे की मी किती ही वर्षे जगलो तरी मला वेळ कधी पुरणार नाही) आणि त्याची कारणे किंवा सबबी देऊन मी लिहिण्याची टाळाटाळ करतोय असे समजू नये. लिहिणे हे माझ्या ( रिकाम्या वेळेतील) आवडत्या छंदांपैकी एक. पण या ना त्या कारणाने ते जमत नाही अन् मी वेळेला मारण्याऐवजी वेळच मला मारुन नेते. माझे इतर ब्लॉगर मित्र दिवसा-दिवसाला धडधड पोस्ट टाकत असताना मला त्या वाचायला ही वेळ मिळत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो(!) आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते(!!) मग मी मोठ्या निर्धाराने ठरवतो की उद्याच नवी पोस्ट टा…

माझी आजारपणे

Image
आजारपण काही कुणाला सांगून येत नाही, ते येते अनपेक्षीतपणे, एखाद्या वादळी वार्‍याप्रमाणे. ते येते, जे काही सुरळीतपणे चालले आहे ते बिघडवते आणि आपण हताशपणे पाहत राहतो. मग पुन्हा नव्याने सुरूवात...

आजारपण म्हणजे नुसतेच बेडवर पडून राहणे असते तर एक वेळ ठीक होते पण आजारपण त्यासोबत औषध व गोळयांची फौजही घेऊन येते. मला या एका कारणासाठीच आजारपण आवडत नाही. आतापर्यंत आजारपणातील औषध आणि गोळयांच्या एवढ्या बाटल्या मी रिचवल्या आहेत की मी एखादे केमिस्टचे दुकान टाकून फावल्या वेळात त्या खात बसायला हव्यात. या बाबतीत ही मी थोडा आळशीच आहे. आतापर्यंत कोणत्या आजारावर कोणत्या गोळ्या खाव्यात याची काही नोंद ठेवली असती तर डॉक्टर भेटीचा योग सारखा-सारखा आला नसता. निदान पार्टटाइम जॉब म्हणून आमच्याकडे अमुक-तमुक आजारावर औषधे मिळतील असा बोर्ड ही लावता येईल.

पूर्वीच्या काळी बायकांनी बाळंतपणाच्या गोष्टी सांगाव्या अशी बरीच बाळे त्यांना असत. त्या एकदा सुरू झाल्या की अनेक आठवणी निघत. माझ्या बाबतीतही अशी अनेक आजारपणे झाल्याने मला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्या प्रत्येक आजारपणाची काही लेखी नोंद ठेवली असती तर एव्हाना एखादे …

झोप गेली उडून...

Image
सुखाची झोप काही आमच्या नशीबी नाही...! लहानपणापासूनच माझे आणि झोपेचे संबंध अनिश्चिततेच्या झुल्याने बांधले गेले आहेत. मी जेव्हा जेव्हा प्रयत्नपूर्वक झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दर वेळीस डोळे 'आ' वासून झोपेला दूर दूर जाताना पाहिल्याचे मला आठवते. झोप ही अशी हळूवार क्रिया असल्याने मी डोळे घट्ट मिटून झोपण्याचा प्रयत्न करता न येणारी झोप अधिकच बेचैन करत राहते. मग शेवटी सुरू राहते ते केवळ विचारांचे चक्र आणि ते चालूच राहते...

कधी कधी मला वाटते की माणूस विचार करत नसता तर कसे झाले असते? म्हणजे रात्रभर जागून ही जर डोक्यात काहीच विचार आले नसते तर मी नक्कीच एखादा साधू अथवा ऋषिमुनी झालो असतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. माझ्या विचारांचे घड्याळ असे अविरत चालू राहिल्याने माझ्या कित्येक थोर विचारांचे श्रेय या न येणार्‍या झोपेलाच आहे. बर्‍याच कविता ही मी रात्री न येणार्‍या झोपेच्या भरातच केल्या आहेत. मग आई-बाबांना जाग येऊ नये म्हणून अंधारात चाचपडत एखाद्या कोर्‍या कागदावर खरडल्याही आहेत. ( काय लिहितोय हे दिसत नसताना ही !) हल्ली हल्ली मोबाईल आल्याने आता मोबाईल वरच कविता लिहीणे होते आणि शिवाय कित्ये…

सचिन - दिग्विजयी योद्धा

Image
वेळ-संध्याकाळी ६ ते ६.३० दरम्यानची. एव्हाना पर्यंत सचिन तेंडुलकरने तुफानी फलंदाजी करत रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. ५०व्या षटकाच्या ३र्‍या चेंडूवर सचिन स्ट्राईक वर आला तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.हृदयाचे ठोके वाढले होते, हात-पाय थरथरत होते, नखे कुरतडून संपुष्टात आली होती. भारतभर लाखो-करोडो क्रिकेटप्रेमी एकाच वेळी हात जोडुन देवास प्रार्थना करत होते. कुणी देव पाण्यात ठेवले होते, तर कुणी जागचे हलतच नव्हते. ( ही उगाच आपली अंधश्रद्धा ! जागचे हलले म्हणजे विकेट जाते म्हणे!) बस्स अजुन एक रन....! उत्कांठेपायी काय करू आणि काय नको. सर्वांच्या नजरा टी.व्ही. वर खिळलेल्या. चार्ल्स लँग्वेल्ट ने धाव घेतली. चेंडू टाकला,सचिनने हलकेच कट करत ऑफ साईडला भिरकावला आणि सार्‍या भारतभर एकच जल्लोष.....नाबाद २०० !
सचिन रमेश तेंडुलकर...भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींचे दैवत. हो दैवतच...! याहून दुसरा काही योग्य शब्द नाही. तो भलेही हे देवपण नाकारत असेल. पण त्याच्या कृतीतून, देहबोलीतून तो असामान्य असल्याचे वेळोवेळी जाणवते. तो जे बोलत नाही ते त्याची बॅट बोलते आणि आजही त्याने हे सिद्ध केले की त…

स्वप्नांचे जग

Image
डोळे उघडले ते आईच्या आवाजाने. रविवारची सकाळ म्हणजे बर्‍याच आरामशीर उठण्याचा कार्यक्रम. तसे रोज काही फार लवकर उठतो अशातला भाग नाही. पण निदान आठवड्यातून एक दिवस तरी झोपेतील स्वप्ने अर्धवट राहत नाहीत. नाहीतर बाकीचे सहा दिवस म्हणजे साखर झोपेची वेळ, स्वप्न ऐन रंगात आलेले आणि नेमका त्यावर अलार्मचा खणखनाट !
स्वप्ने पाहायला तशी प्रत्येकालाच आवडतात. मला तर झोपेत असंख्य स्वप्न पडत असतात अन् तेही दररोज. ह्या माझ्या मनाचे मला काही करता येत नाही. निवांत झोपावे म्हणाव तर झोपेतही सतत काही ना काही खटपट चालू. हा स्वप्नांचा कारभार गेली कित्येक वर्षे चालू आहे ( अर्थात इतके काही वय नाही झाले माझे...!) म्हणजे फार लहान होतो तेव्हा मला कधी झोपलो अन् जागा कधी झालो हे कळत नव्हते. पण फार लवकरच मी विचार करायला लागलो आणि ही भलतीच दुनिया सापडली...
निद्रितावस्थेतील स्वप्नांबद्दल हल्लीच माझ्या वाचनात आले की माणसाला नेहमी पहाटे पडलेली स्वप्नेच आठवतात. अपवाद फक्त त्या स्वप्नांचा जेव्हा रात्री आपण अचानक दचकून जागे होतो. अन्यथा झोपेतून उठल्या नंतर माणूस ५ मिनिटा पर्यंत ५० % स्वप्न विसरून जातो आणि १० मिनिटा पर्यंत ९०% वि…