Posts

Showing posts from February, 2011

प्रेमात पडतो जो तो...

Image
प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना. आपल्या आवडत्या व्यक्तीशी असणारे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते यात त्या दोन जीवांना जोडणारा दुवा म्हणजे प्रेम. आपण प्रेम कुणावरही करू शकतो पण तरीही प्रेम म्हटले की प्रथम आपल्याला आठवतात ते दोघेच-प्रियकर आणि प्रेयसी. प्रेमात पडल्यावर कसे सर्व जग रंगीबेरंगी वाटू लागते. आपल्यावर प्रेम करणार्‍या किंवा आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचे बोलणे, हसने, तिचा आवाज, तिचे असणे-नसणे सगळ्याला खूप जास्त महत्त्व मिळायला लागते आणि तिच्या शिवाय या जगात काहीच सुंदर भासत नाही. तिच्याच आठवणीत रमू लागतो, तिच्याच भोवती घुटमळू लागतो. ती म्हणजे प्रेम, ती म्हणजे आयुष्य, ती म्हणजे सर्वस्व. प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कविता सुचू लागतात. कित्येकांना गाणीही सुचू लागतात किंवा निदान आपण बरे गातो असे भास तरी होतात कारण प्रेमात पडल्यापासून बरीच रोमॅंटिक गाणी गुणगुणायला सुरूवात झालेली असते. आपल्या मोबाईल मध्ये तिला आवडणारी गाणी ठेवली म्हणजे बरेच फायदे होतात. एकतर आपले महत्त्व फार वाढते शिवाय गाणी ऐकण्याच्या निमित्ताने आपल्याला तिची कंपनीही मिळते. त्यात ही जर एक हे

वर्ल्ड कप आला रे...

Image
क्रिकेट म्हणजे आपला एकदम लाडका खेळ. क्रिकेट खेळणे, पाहणे, क्रिकेट वर गप्पा, चर्चा या सगळ्यातच भारतीय लोकांना प्रचंड रस आहे. हल्ली तसे क्रिकेट मध्ये २०-२० आल्यापासून मूळ क्रिकेटकडे फारच दुर्लक्ष झाले आहे. २०-२० वर्ल्डकप शिवाय आयपीएल यांच्यामुळे क्रिकेट मधील रंगत निघून गेली आहे. सध्याच्या फास्ट लाईफला हे शोभणारे असले तरी अजूनही वन डे आणि टेस्ट बघणे तितकेच छान वाटते. आता तर क्रिकेट पाहायला मोठे कारणच मिळाले आहे ते म्हणजे वर्ल्ड कप २०११. वर्ल्ड कप केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपलाय आणि क्रिकेट रसिकांमध्येही चर्चेला सुरुवात झालीय.विशेष म्हणजे या वर्षी वर्ल्ड कप भारतात होत आहे त्यामुळे पूर्ण भारतभर सध्या क्रिकेट-फिवर चढला आहे. स्टंपी-मॅस्कॉट वर्ल्ड कपचे हे १० वे वर्ष. यापूर्वी ९ वेळा वर्ल्ड कप स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या देशात ही स्पर्धा घेतली जाते. १९८७ च्या वर्ल्ड कप नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात आली आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून वर्ल्ड कप होत असल्याने जुन्या सिरीज काही पाहायला मिळाल्या नाहीत. पण जेव्हा पासून क्रिकेट कळायला लागले तेव्हा पासून हा खेळ आवडतो आहे. वर्ल्ड