Posts

Showing posts from April, 2011

मला भारतरत्न पाहिजे !

Image
बस...ठरलं ! आता अजून काही नाही...हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच...काय म्हणता ? मला कशाला...? छे छे...माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय...मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता...भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत.

मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने द्विशतक केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्याने …