Posts

Showing posts from May, 2011

सिरीयल कीलिंग

आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत.

मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त्…

कलेचं देणं

कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पाहिले तर प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या कलेचे वरदान लाभलेले असते. महत्वाचे हे आहे की आपण त्या कलेला कसे जोपसतो ते. कित्येकांना आपल्या अंगी असणार्‍या कलेचे महत्त्वच कळत नाही. काहींना ते ठाऊक असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की कला हे देवाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जिथे आपण 'मी'पणा विसरून त्या कलेच्या धुंदीत हरवून जातो आणि या कलेतून मिळणारा आनंद ही स्वर्गीयच असतो, थेट ईश्वराशी भेट व्हावी असा.

कला नक्की काय आहे? ती एक ईश्वरसेवा आहे, ती मनोरंजनासाठी आहे, समाजप्रबोधनासाठी आहे की केवळ पैसा कमवण्यासाठी आहे. ती याहून बरेच काही आहे. कलेतून पैसा कमावणे हा त्याच्या प्राथमिक हेतू तरी नक्कीच नाही. तरीही जे अगदीच गरीब आहेत, ज्यांचा उदरनिर्वाहच या कलेवर आहे, ज्यांना ती अमुक एखादी कला सोडून काही येत नाही त्यांनी आपला संसार चालवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कलेचा वापर केला तर त्यास काही एक हरकत नाही. बहुधा देवाने ती कला त्यांना यासाठीच दिली असावी. …