Posts

Showing posts from November, 2011

बालपणीचा खेळ सुखाचा

Image
या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे. पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप

दुसरा वाढदिवस

Image
गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही. तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही. पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच. वाढदिवसाच

'आर' फॉर रॉकस्टार

Image
"११.११.११"  जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो. पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. ' जो भी मैं कहना चाहू.. ' इथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची  (रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढ