Posts

Showing posts from January, 2012

शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

Image
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते. डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते. शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात खड्डा पडल

अस्वच्छ भारत

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील. मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत! बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबद