Posts

Showing posts from June, 2012

आयपीएलचा बाजार

नाही म्हणता म्हणता आयपीएलचे पाचवे पर्वही संपले. आयपीएल सुरु झाले तेव्हा कुमार वयात असणारे आम्ही आता तारुण्यात आलो असे हल्लीच माझ्या लक्षात आले. सुरुवातीला आयपीएलच्या बाबतीत आम्ही फार काही खुश नव्हतो. पहिलेच वर्ष असल्याने फारच गोंधळ दिसत होता. एरवी भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या व्यतिरिक्त काही रंजक सामने होऊ शकतात अशी कल्पना नव्हती. आता आयपीएलचा कारभार, आयपीएल टीम्स सगळ्या अंगवळणी पडल्याने मुंबई-चेन्नई, दिल्ली-कोलकाता अशा मॅचेससुद्धा आवडीने पहिल्या जाऊ शकतात हे कळले आणि आयपीएलच्या बाबतीत कुठलीही मॅच रंगतदार होऊ शकते त्यामुळे वेडा क्रिकेटप्रेमी हौशीने सगळ्या मॅचेस पाहत बसतो. एखादे नव्या पद्धतीचे गाणे पहिल्यांदा ऐकले की कळत नाही आणि आवडतही नाही पण वारंवार ऐकून आणि बाकीच्यांना कळते आणि आवडते तर मला का नाही म्हणून आपल्याला ही आवडायला लागते तसे आयपीएलचे झाले आहे. पहिल्या वर्षी हा प्रकार काय आहे, तो राहणार की जाणार हे कळेपर्यंत स्पर्धा संपलीदेखील. आता आयपीएलला नावे ठेवणार्यांनीही हे स्वीकारले आहे आणि एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याकडे पाठह