Posts

Showing posts from January, 2014

'टाईमपास'वाला लव

Image
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्या चित्रपटाची भरपूर हवा झाली आहे तो म्हणजे 'टाईमपास'. रवि जाधव यांचा हा चौथा चित्रपट. नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या रवि जाधव यांनी त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय आणि त्याला उत्तमरित्या प्रसिद्धी मिळवून दिल्याने जिकडे तिकडे 'टाईमपास'ची चर्चा आहे.

ही आहे दगडू आणि प्राजक्ताची लवस्टोरी. दगडू जो एका गरीब घरातील वाया गेलेला मुलगा आहे आणि प्राजक्ता जी एका संस्कारी घरातील गुणी मुलगी आहे. पण प्रेमाला वय, जात-पात, गरीब-श्रीमंत कसल्याच मर्यादा नसतात त्यामुळे प्राजक्तासारखी सुंदर मुलगी देखील दगडू सारख्या मवाली पोराच्या प्रेमात पडू शकते हे चित्रपट पाहताना आपल्याला मुळीच खटकत नाही. मित्रांच्या सांगण्यावरून दगडू प्रेमात पडायचे ठरवतो आणि प्राजक्ताला पटवण्याची शपथ घेतो. मग मुलीला पटवण्यासाठी जे काय करावे लागते ते अनेक उद्योग करतो आणि प्राजक्ताला पटवतो. पण दोघे मनापासून प्रेम करत असले तरी या वयातील प्रेमाला लफडी म्हणून जे सर्वसामान्य पालक करतात तेच त्यांचे पालक करतात आणि शेवटी प्रेमाची गोष्ट केवळ 'टाईमपास' होऊन…