Posts

Showing posts from September, 2010

गणेश विसर्जन सोहळा

गणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्‍या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल. गेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आ

खो-बाई-खो

मिळाला एकदाचा खो! गेल्या आठवड्यात सुहास ने खो दिला आणि मग 'आलिया भोगासी असावे सादर' प्रमाणे ही पोस्ट करायची वेळ आली. सर्वप्रथम ब्लॉग विश्वात हे खो-खो चे प्रकार चालू झाले तेव्हा वाटले की आपण काही या जाळ्यात अडकणार नाही पण खो-खो ची साथ वेगाने पसरत चालली आहे आणि जो तो आपला खोकत बसलाय. अनुवादासाठी मी कोणते गाणे निवडावे हा एक मोठा प्रश्न पडला होता...बरीच उलथापालथ केल्यानंतर एक गाणे निवडले जे माझे खूप आवडते आहे. 'प्यार का मौसम' या चित्रपटातील 'तुम बिन जाऊ कहाँ'. हे गाणे किशोरदा आणि रफीसाहेब दोघांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे आणि वेगवेगळ्या कडव्यांसह रेकॉर्ड झाले आहे. अनुवाद करायचा असला तरी अगदी शब्द:शह अनुवाद न करता तो अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा या प्रयत्नास नक्की प्रतिसाद द्या. एक विनंती अशी की कृपया गाण्याच्या मूळ चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा सुचेल त्या चालीवर गा. मूळ गीत- मोहम्मद रफ़ी- तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके कुछ ना फिर चाहा कभी तुमको चाहके, तुम बिन .. देखो मुझे सर से कदम तक, सिर्फ़ प्यार