Posts

Showing posts from 2015

मनातला किल्ला

Image
काही चित्रपट करमणूक करतात, काही चित्रपट सामाजिक असतात. किल्ला सारखे काही चित्रपट भावनिक असतात. अशा चित्रपटात पटकथेत अनेक अदृश्य संवाद लिहिलेले असतात. ते सांगत राहतात मुक्याने जे सांगायचे ते. ती भाषा ज्यांना कळते त्यांना चित्रपट कळतो आणि भावतो. पुण्यात वाढलेला चिन्मय काळे आणि त्याची आई अरुणा यांच्या भोवती मुख्य कथानक लिहिले आहे. पतीच्या निधनानंतर सरकारी नोकरीच्या बदलीमुळे हे दोघे गुहागर येथे स्थायिक होतात. शहरातून गावाकडे स्थलांतरित होणे जिथे अनेक सुविधांचा अभाव आहे चिन्मयला सोपे जात नाही. त्याची आई जी परिस्थितीला सामोरी जात स्वत:ला व मुलाला सावरू पाहते आहे तिलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्यात या दोघांचे नाते कधी कोमेजते तर कधी बहरते पण तरीही घडत जाते. पुण्यासारख्या शहरी वातावरणातून गुहागर येथील ग्रामीण ठिकाणी नवी शाळा, नवे मित्र, नवा परिसर यांच्याशी जुळवून घेणे हे चिन्मयसाठी अवघड होऊन जाते. बालवयात अनपेक्षितपणे अशा बदलांना सामोरे जाताना चिन्मयचे जगही बदलत जाते. सुरुवातीला मनाविरुद्ध या गावी आलेला, वेळोवेळी परत पुण्याला जाण्याचा हट्ट धरणारा चिन्मय आणि शेवटी स