Posts

Showing posts from November, 2010

पहिला वाढदिवस

Image
मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले. शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो. १८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती. काहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत च

दिवाळी-कालची आणि आजची...

Image
सर्वप्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!! दिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात. तेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून