Posts

Showing posts from January, 2013

बीपी पाहावा !

Image
काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा. अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवा

दुनियादारी ! दुनियादारी !!

Image
दुनियादारी हे एक व्यसन आहे.  दुनियादारी म्हणजे तरुणाई ! दुनियादारी म्हणजे प्रेमभंग ! दुनियादारी म्हणजे अतूट मैत्री ! दुनियादारी म्हणजे कोमेजलेले बालपण ! दुनियादारी म्हणजे नियतीने केलेली फसवणूक ! दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण ! दुनियादारी वाचून जो त्याच्या प्रेमात पडत नाही तो तरुण नाही आणि जो वयाने तरुण नसूनही त्याला ती आवडत नाही तर तो मनानेही तरुण नाही. दुनियादारीची स्वतंत्र अशी एक शैली आहे. ती स्पष्ट आणि सरळ आहे आणि ती तशी आहे म्हणून वाचक तिच्यावर प्रेम करतात. याशिवाय दुनियादारी एक काल्पनिक सत्यकथा आहे. वाचक दुनियादारी 'ढापतात', वाचनालयातून वा मित्राकडून नेलेली परत आणून देत नाहीत या अशा कारणांमुळे मी सर्वांना दुनियादारी वाचायला सुचवतो पण देत नाही. दुनियादारीने सर्वप्रथम हेच शिकवले. दुनियादारीचे कथानक नाट्यमय आहे पण नाटकी नाहीये आणि ते नसे न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कथानकातील पात्रांच्या तोंडी असणारे संवाद. लेखकाच्या म्हणण्यानुसार दुनियादारी ही एक काल्पनिक सत्यकथा असल्याने ही पात्रे कुठेही सहज आढळणारी आहेत म्हणूनच त्यांचे संवादही तितकेच खरे असणे ही कथानका