Posts

Showing posts from February, 2010

सचिन - दिग्विजयी योद्धा

Image
वेळ-संध्याकाळी ६ ते ६.३० दरम्यानची. एव्हाना पर्यंत सचिन तेंडुलकरने तुफानी फलंदाजी करत रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. ५०व्या षटकाच्या ३र्‍या चेंडूवर सचिन स्ट्राईक वर आला तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.हृदयाचे ठोके वाढले होते, हात-पाय थरथरत होते, नखे कुरतडून संपुष्टात आली होती. भारतभर लाखो-करोडो क्रिकेटप्रेमी एकाच वेळी हात जोडुन देवास प्रार्थना करत होते. कुणी देव पाण्यात ठेवले होते, तर कुणी जागचे हलतच नव्हते. ( ही उगाच आपली अंधश्रद्धा ! जागचे हलले म्हणजे विकेट जाते म्हणे!) बस्स अजुन एक रन....! उत्कांठेपायी काय करू आणि काय नको. सर्वांच्या नजरा टी.व्ही. वर खिळलेल्या. चार्ल्स लँग्वेल्ट ने धाव घेतली. चेंडू टाकला,सचिनने हलकेच कट करत ऑफ साईडला भिरकावला आणि सार्‍या भारतभर एकच जल्लोष.....नाबाद २०० ! सचिन रमेश तेंडुलकर...भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींचे दैवत. हो दैवतच...! याहून दुसरा काही योग्य शब्द नाही. तो भलेही हे देवपण नाकारत असेल. पण त्याच्या कृतीतून, देहबोलीतून तो असामान्य असल्याचे वेळोवेळी जाणवते. तो जे बोलत नाही ते त्याची बॅट बोलते आणि आजही त्याने हे सिद्ध केले की