Posts

Showing posts from July, 2012

आमचे क्लासेस जॉइन करा

शाळा सुरु होऊन दोन दिवस झाले होते. राणेसर त्यांच्या गणिताच्या तासासाठी 'दहावी अ'च्या वर्गात आले. इतर शिक्षकांप्रमाणे त्यांनीही सर्वांना यंदा दहावीचे वर्ष आहे आणि त्यांनी भरपूर अभ्यास करायला हवा याबद्दल सूचना दिल्या. त्याच वर्गात सोहम नावाचा विद्यार्थी होता जो गेल्या वर्षी परीक्षेत पहिला आला होता आणि गणितात तो विशेष हुशार असल्याने सरांचाही लाडका होता. आपला तास संपल्यावर राणेसरांनी त्याला शाळा सुटल्यावर भेटायला सांगितले त्याप्रमाणे तोही सर्व विद्यार्थी गेल्यावर स्टाफरूमकडे निघाला. सर त्याची वाट बघत स्टाफ रूमच्याबाहेरच उभे होते. ''काय सर, तुम्ही बोलावलं होतं मला ?'' ''हो, अरे यंदा दहावी, अभ्यास जोरदार असायला हवा या वर्षी !" "ठाउक आहे सर, सुट्टीत सुरुवात केलीये थोडी" "ते अपेक्षित होतंच मला, अभ्यास कसा चाललाय मग? " "चालू आहे...नेहमीप्रमाणे " "तू या वर्षीही क्लास लावला नाहीयेस म्हणे. गेल्या वर्षीपर्यंत ठीक होते पण आता दहावीला एक-एक मार्क किती महत्त्वाचा ठरतो माहिती आहे ना" "माहिती आहे सर...पण मला...ना