Posts

Showing posts from January, 2011

रिऍलिटी शो जिंकायचाय ?

Image
हल्ली सगळीकडे रिऍलिटी शो ची चलती आहे. प्रत्येक चॅनेलवर एक तरी रिऍलिटी शो आहेच. काही वर्षापूर्वी जिथे डेलीसोप्सने कब्जा केला होता तिथे आता रिऍलिटी शो ने त्यांची जागा बळकावली आहे. गायन, नृत्य, अभिनय, विनोद यांच्याबरोबरच अनेक विषयांवर रिऍलिटी शो सुरू झाले आहेत. त्यात क्वीज कॉंटेस्ट, कुकिंगपासून वेट लूसिंग पर्यंत बर्‍याच विषयांनी घुसखोरी केली आहे. आणि विशेष म्हणजे लोकांना हे पाहायला आवडत आहेत.कॉलेजगोइंग क्राउड पासून ते ऑफीसमधल्या स्टाफ पर्यंत सर्वत्र याची चर्चा चालू असते. रिऍलिटी शो मधले स्पर्धक ही रातोरात स्टार होऊन जातात. इतक्या कमी वेळात प्रसिद्धी मिळत असेल तर कोणाला नको आहे. म्हणून या स्पर्धांमध्ये भाग घेऊन झटपट नाव कमवायच्या हेतूनेच सर्व जण इथे रांगा लावतात. एकदा टी. व्ही. वर झळकलो की पुढचा मार्ग सोपा होऊन जातो आणि त्याहून पुढे जर ती स्पर्धा जिंक्लो तर लॉटरीच लागली. रिऍलिटी शो जिंकण्यासाठी काय करावे लागते? तसा तर काही १००% यशस्वी होणारा फॉर्म्युला यासाठी नाहीये पण जर तुम्ही किंवा तुमचे मित्र, नातेवाईक या स्पर्धेत भाग घेत असतील तर काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या. तुम्हाला रिऍलिटी शो

संकल्पाची ऐशीतैशी

Image
दरवर्षी संकल्प होतात, दरवर्षी मोडले जातात. मोठ्या उत्साहात आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपले संकल्प सांगून मोकळे होतो आणि संकल्प पूर्ण करण्याची 'जबाबदारी' ही सोडून मोकळे होतो. यातील बहुतेकांचे संकल्प तर पहिल्या दिवशीच मोडले जातात. पण उपवास मोडला तरी चालेल पण संकल्प पूर्ण करायचाच असे हट्टाला पेटणारे ही काही आहेत. मग तऱ्हेतऱ्हेचे संकल्प सोडले जातात त्यातील पूर्ण किती होतात हे महत्वाचे नसले तरी संकल्प करतात हे खरे. काही दिवसांनी हेच लोक नसत्या फंदात पडलो म्हणून वैतागतात आणि जे शहाणे लोक असतात ते या लोकांची फजिती पाहत बसतात. संकल्प करणार्‍यांपैकी फार कमी जण ते पूर्ण करतात नाहीतर इतरांना त्यांनी संकल्प केले होते याची आठवण करून द्यावी लागते. आणि मग, ''अरे हो रे, केला 'होता', वेळ नाही मिळत रे, तर तर लक्षात आहे माझ्या..., बरी आठवण केलीस '' असली उत्तरे मिळतात. काही जण फक्त लोकांना सांगण्यासाठीच संकल्प करतात आणि ते पूर्ण होणार नाही याची खात्री बाळगूनच.संकल्प कोणता करावा आणि कोणता करू नये यावर काही एक बंधन नाही कारण ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.