Posts

Showing posts from March, 2012

महाशतकवीर

Image
'वाट पाहुनी जीव शिणला' होता सगळा चाहत्यांचा पण तो सोनियाचा दिवस काही येतच नव्हता. गेल्या वर्षी आफ्रिकेविरुद्ध ९९चा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्या १०० व्या महाशतकाची महाप्रतीक्षा सुरु झाली. मग सेमी फायनलला पाकविरुद्ध करणार, फायनलला वानखेडेवरच करणार, इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर नक्कीच, त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध १०० टक्के असे करता करता १६ मार्च उजाडला आणि एकदिवसीय सामन्यात ज्याची पाटी कोरी होती त्या बांग्लादेश विरुद्ध 'महाशतक' लागले आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे वर्षभराचे टेन्शन संपले. सचिनबद्दल काही बोलायचे म्हणजे आपल्या क्षेत्रात कितीही ग्रेट असलो तरी आपण ह्या सागरातील एक थेंबही नाही असे वाटत राहावे असा त्याचा पराक्रम. तसे मी १ वर्षाचा होतो तेव्हापासून तो खेळतो आहे. २२ १/२ वर्षांची त्याची कारकीर्द, त्याचे वय, त्याचे कर्तृत्व पाहता मी त्याला सचिनजी किंवा सचिनसरच म्हणायला हवे पण इतका आदर असूनही त्याला हे असे संबोधणे माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीलाही जमले नाही. आम्ही कायम त्याला सचिन, सच्चू आणि कधीकधी तेंडल्याही म्हटल्याचे आठवते पण त्यात अनादर करण्य