Posts

Showing posts from December, 2012

कृष्णधवल पाने

Image
निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे... माझ्याबाबतीत असे आहे की मला कायमच इतिहासाचे किंवा आपण न पाहिलेल्या काळाचे आकर्षण आहे. विज्ञानाने माणसाला भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी दिली तरी इतिहासाने त्याला अनुभवाने आलेले शहाणपण दिले. वर्तमान हातात आहे, भविष्य तर काय येणारच आहे. पण भूतकाळ मात्र येणार नाही. भूतकाळात किंवा स्वप्नरंजनात फार काळ रमणे ठीक नसले तरी भूत आणि भविष्य या दोघांपैकी काही निवडायची वेळ आली तर मी भूतकाळात डोकावणे पसंत करेन. गतकाळाकडे प्रामुख्याने आकर्षित करणारी माध्यमे म्हणजे सिनेमे आणि छायाचित्रे. पुस्तके किंवा छापील साहित्य आपल्याला बरीच माहिती देते पण कल्पनेच्या माध्यमातून ते डोळ्यांपुढे येण्यासाठी आपण पाहिलेल्या घटनांचेच संदर्भ जुळतात. या भूतकाळाबाबत नेहमी असे वाटते की तो मुळातच अशा कृष्णधवल रंगात अस