Posts

Showing posts from August, 2010

कार्टून नेटवर्क-रिलोडेड

Image
माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया. कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी' . गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत.

निषेध!निषेध!!

Image
निषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम! आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्‍या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्‍या, न रुचणार्‍या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) - १.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्‍या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण

सैनिकहो तुमच्यासाठी...

Image
भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी... गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील काही ओळी अशा... परि आठव येता तुमचा... आतडे तुटतसे पोटी... खरंच तुटते का? आशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही. माफ करा आम्हाला, कारण स्वातंत्र्यदिन साजरा

रक्तरंजीत पुस्तक

नुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये. सचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस ! एरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे