दुसरा वाढदिवस
तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही.
पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच.
वाढदिवसाचे आमंत्रण सगळ्यांना दिले आहेच, शुभेच्छा द्यायला विसरू नका...:)
व्वा व्वा !!
ReplyDeleteअभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.. लिहिते रहा !!
सागरा ,दोन वर्ष पतंग उडवत ठेवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन रे ...पुलेशु ... :)
ReplyDeleteधन्यवाद सुझे...
ReplyDeleteसध्या वेळ आहे तर लिहून घेईन म्हणतो :)
देवा...
ReplyDeleteपतंग तर उडतच राहणार...वर्षानुवर्षे!!
अरे वा.. मस्तच.. अभिनंदन सागरा.
ReplyDeleteधन्यु...हेरंबा !!
ReplyDelete