Posts

पाऊसगाणी

Image
जून महिना सुरु झालाय आणि पाऊस आता मुक्तहस्ताने बरसू लागलाय. उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीस तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदसोहळा सुरु झाला. पावसाच्या ओघानेच मग पाऊसगाणीही साऱ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली. कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. म्हणूनच पाऊसगाण्यांनी भिजलेला हा ओला लेख. पावसाचे वेड तर तसे सगळ्यांनाच आहे आणि तसेच पाऊसगाण्यांचेही. पण ब्लॉग मराठी असल्याने आणि मराठी भाषेवर आणि संगीतावर हिंदीहून जास्त प्रेम असल्याने आज केवळ मराठी पाऊसगाणीच ऐकुया. पावसावर कविताही असंख्य लिहिल्या गेल्यात पण त्यांची संख्या आणि उपलब्धता पाहता त्याच्यावर लिहिणे फारच कठीण आहे. म्हणून आपल्या आवडीची, मनोमनी रुजलेली व काही नवी पाऊस गाण्याची मैफिल आज ब्लॉगच्या दरबारी सादर करीत आहे. बालपणीचा पाऊस म्हटला कि सर्व प्रथम आठवणारे बालगीते म्हणजे - 'येरे येरे पावसा...' ज्या कुठल्या मराठी कुटुंबात हे गाणे पावसाकडे पाहून पालकांनी आपल्या चिमुकल्यांस शिक...

सिरीयल कीलिंग

आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत. मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त...

कलेचं देणं

कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पाहिले तर प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या कलेचे वरदान लाभलेले असते. महत्वाचे हे आहे की आपण त्या कलेला कसे जोपसतो ते. कित्येकांना आपल्या अंगी असणार्‍या कलेचे महत्त्वच कळत नाही. काहींना ते ठाऊक असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की कला हे देवाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जिथे आपण 'मी'पणा विसरून त्या कलेच्या धुंदीत हरवून जातो आणि या कलेतून मिळणारा आनंद ही स्वर्गीयच असतो, थेट ईश्वराशी भेट व्हावी असा. कला नक्की काय आहे? ती एक ईश्वरसेवा आहे, ती मनोरंजनासाठी आहे, समाजप्रबोधनासाठी आहे की केवळ पैसा कमवण्यासाठी आहे. ती याहून बरेच काही आहे. कलेतून पैसा कमावणे हा त्याच्या प्राथमिक हेतू तरी नक्कीच नाही. तरीही जे अगदीच गरीब आहेत, ज्यांचा उदरनिर्वाहच या कलेवर आहे, ज्यांना ती अमुक एखादी कला सोडून काही येत नाही त्यांनी आपला संसार चालवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कलेचा वापर केला तर त्यास काही एक हरकत नाही. बहुधा देवाने ती कला त्यांना यासाठीच दिली असावी....

मला भारतरत्न पाहिजे !

Image
बस...ठरलं ! आता अजून काही नाही...हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच...काय म्हणता ? मला कशाला...? छे छे...माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय...मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता...भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत. मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने द्विशतक केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्य...

विकेट

Image
क्रिकेट आणि आपले जीवन हे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी कुठे न कुठे जोडले जातात. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे हे होणे साहजिक आहे आणि भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विषयी चर्चा, वाद-विवाद हे नित्यनेमाने होत असतात. कुणी कशी कॅच घेतली, कुणी किती सिक्स मारले, कुणी किती मॅचेस जिंकल्या, कुणी किती विकेट्स काढल्या etc . क्रिकेटप्रेमी हल्ली एक नवीन वाक्प्रचार वापरू लागले आहेत तो म्हणजे 'विकेट जाणे'. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण कुण्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीला हल्ली विकेट जाणे असे क्रिकेटच्या शब्दकोशातील शब्द येऊ घातले आहेत. You Are OUT! काही दिवसांपूर्वी एका मित्राचा अपघात झाला आणि त्यातच गेला. मित्र म्हणजे फार जवळचा नसला तरी ओळखीच्यांपैकी होता आणि त्याचा अपघात असाच बाईकवर असताना झाला. बाईक अपघात हा काही नवीन प्रकार नाही. तारुण्यात प्रवेश केला कि प्रत्त्येकाला बाईक हवी असते. तरुणांना फक्त क्रेझ असते ती वेगाची, आपल्यापेक्षा फास्ट पळणाऱ्याला मागे टाकण्याची. या क्षुल्लक गोष्टीपायी सुद्धा कित्येकांनी जीव गमावले आहेत किंवा दुखापती करून घेतल्या आहेत. कशाला आपण या मोहात पडत र...

प्रेमात पडतो जो तो...

Image
प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना. आपल्या आवडत्या व्यक्तीशी असणारे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते यात त्या दोन जीवांना जोडणारा दुवा म्हणजे प्रेम. आपण प्रेम कुणावरही करू शकतो पण तरीही प्रेम म्हटले की प्रथम आपल्याला आठवतात ते दोघेच-प्रियकर आणि प्रेयसी. प्रेमात पडल्यावर कसे सर्व जग रंगीबेरंगी वाटू लागते. आपल्यावर प्रेम करणार्‍या किंवा आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचे बोलणे, हसने, तिचा आवाज, तिचे असणे-नसणे सगळ्याला खूप जास्त महत्त्व मिळायला लागते आणि तिच्या शिवाय या जगात काहीच सुंदर भासत नाही. तिच्याच आठवणीत रमू लागतो, तिच्याच भोवती घुटमळू लागतो. ती म्हणजे प्रेम, ती म्हणजे आयुष्य, ती म्हणजे सर्वस्व. प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कविता सुचू लागतात. कित्येकांना गाणीही सुचू लागतात किंवा निदान आपण बरे गातो असे भास तरी होतात कारण प्रेमात पडल्यापासून बरीच रोमॅंटिक गाणी गुणगुणायला सुरूवात झालेली असते. आपल्या मोबाईल मध्ये तिला आवडणारी गाणी ठेवली म्हणजे बरेच फायदे होतात. एकतर आपले महत्त्व फार वाढते शिवाय गाणी ऐकण्याच्या निमित्ताने आपल्याला तिची कंपनीही मिळते. त्यात ही जर एक हे...

वर्ल्ड कप आला रे...

Image
क्रिकेट म्हणजे आपला एकदम लाडका खेळ. क्रिकेट खेळणे, पाहणे, क्रिकेट वर गप्पा, चर्चा या सगळ्यातच भारतीय लोकांना प्रचंड रस आहे. हल्ली तसे क्रिकेट मध्ये २०-२० आल्यापासून मूळ क्रिकेटकडे फारच दुर्लक्ष झाले आहे. २०-२० वर्ल्डकप शिवाय आयपीएल यांच्यामुळे क्रिकेट मधील रंगत निघून गेली आहे. सध्याच्या फास्ट लाईफला हे शोभणारे असले तरी अजूनही वन डे आणि टेस्ट बघणे तितकेच छान वाटते. आता तर क्रिकेट पाहायला मोठे कारणच मिळाले आहे ते म्हणजे वर्ल्ड कप २०११. वर्ल्ड कप केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपलाय आणि क्रिकेट रसिकांमध्येही चर्चेला सुरुवात झालीय.विशेष म्हणजे या वर्षी वर्ल्ड कप भारतात होत आहे त्यामुळे पूर्ण भारतभर सध्या क्रिकेट-फिवर चढला आहे. स्टंपी-मॅस्कॉट वर्ल्ड कपचे हे १० वे वर्ष. यापूर्वी ९ वेळा वर्ल्ड कप स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या देशात ही स्पर्धा घेतली जाते. १९८७ च्या वर्ल्ड कप नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात आली आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून वर्ल्ड कप होत असल्याने जुन्या सिरीज काही पाहायला मिळाल्या नाहीत. पण जेव्हा पासून क्रिकेट कळायला लागले तेव्हा पासून हा खेळ आवडतो आहे. वर्ल्ड...