Posts

महाशतकवीर

Image
'वाट पाहुनी जीव शिणला' होता सगळा चाहत्यांचा पण तो सोनियाचा दिवस काही येतच नव्हता. गेल्या वर्षी आफ्रिकेविरुद्ध ९९चा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्या १०० व्या महाशतकाची महाप्रतीक्षा सुरु झाली. मग सेमी फायनलला पाकविरुद्ध करणार, फायनलला वानखेडेवरच करणार, इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर नक्कीच, त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध १०० टक्के असे करता करता १६ मार्च उजाडला आणि एकदिवसीय सामन्यात ज्याची पाटी कोरी होती त्या बांग्लादेश विरुद्ध 'महाशतक' लागले आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे वर्षभराचे टेन्शन संपले. सचिनबद्दल काही बोलायचे म्हणजे आपल्या क्षेत्रात कितीही ग्रेट असलो तरी आपण ह्या सागरातील एक थेंबही नाही असे वाटत राहावे असा त्याचा पराक्रम. तसे मी १ वर्षाचा होतो तेव्हापासून तो खेळतो आहे. २२ १/२ वर्षांची त्याची कारकीर्द, त्याचे वय, त्याचे कर्तृत्व पाहता मी त्याला सचिनजी किंवा सचिनसरच म्हणायला हवे पण इतका आदर असूनही त्याला हे असे संबोधणे माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीलाही जमले नाही. आम्ही कायम त्याला सचिन, सच्चू आणि कधीकधी तेंडल्याही म्हटल्याचे आठवते पण त्यात अनादर करण्य...

शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

Image
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते. डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते. शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात ...

अस्वच्छ भारत

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील. मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत! बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबद...

पत्रास कारण की...

Image
शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ? पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आ...

फेसबुक चाट

संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत. मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो. पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन ! माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच... प्राची: हा....य!! मी: हेल्लो...! प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?) मी: एकदम मजेत...तू कशी आहेस? प्राची: आहेस कुठे तू? भेटत नाही, फोन पण नाही. मी: कामं आहेत ग...बिझी असतो आजकाल [:P] प्राची: माझ्यासाठी पण वेळ नाहीये का? मी: तो कसा नसेन...उलट तू ऑफीस सोडल्यापासून बोर होतंय ऑफीसमध्ये...[;)] प्राची: खरंच? अनघा: हाय स्वीटहार्ट....:)  मी: हाय डियर... :) (अजुन एक आली!)  अनघा: कसा आहेस ? [:P]  मी: एकदम मजेत (पुन्हा तेच...!)  अनघा: मला वाटले विसरलास मला...:(  मी: शक्य आहे का ते ? [:D]  अनघा: काय करतोस सध्या? कॉलेज मधले फ्रेण्ड्स भेटतात का कोणी?  मी: तुझ्याखेरीज कोणीच नाही...तुलाच तेवढी आठवण होते माझी [;)]  प्राची: हेल्लो...कुठे हरवलास...?  ...

बालपणीचा खेळ सुखाचा

Image
या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे. पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप ...

दुसरा वाढदिवस

Image
गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही. तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही. पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच. वाढदिवसाच...