Posts

कार्टून नेटवर्क-रिलोडेड

Image
माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया. कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी' . गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत....

निषेध!निषेध!!

Image
निषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम! आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्‍या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्‍या, न रुचणार्‍या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) - १.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्‍या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण ...

सैनिकहो तुमच्यासाठी...

Image
भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी... गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील काही ओळी अशा... परि आठव येता तुमचा... आतडे तुटतसे पोटी... खरंच तुटते का? आशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही. माफ करा आम्हाला, कारण स्वातंत्र्यदिन साजरा...

रक्तरंजीत पुस्तक

नुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये. सचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस ! एरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे...

वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)

Image
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते) आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता ...

समानतेचा निकष

आपल्या देशात नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवयच लागली आहे. एस.एस.सी.बोर्डाचे निकाल लागले आणि यंदा अपेक्षेहून अधिक मार्कांची उधळपट्टी झाली. मुले टेन्शन घेतात, आत्महत्या करतात म्हणून सढळ हाताने गुणवाटप करण्यात आले. सर्वत्र आनंदी-आनंद झाला. आता महत्वाचे काम- मिशन अड्मिशन. आणि अकरावी प्रवेशासाठी एस.एस.सी. बोर्डाप्रमाणे, सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. बोर्ड ही रांगेत उभे राहीले. दरवर्षी प्रमाणे इतर बोर्डाचे विद्यार्थी रांगेत पुढे आणि आपले मराठमोळे विद्यार्थी मागे!. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का? या एस.एस.सी. बोर्डाच्या प्रश्नावर शिक्षणखात्यास आणि हायकोर्टास अजूनही उत्तर सापडले नाही. या पूर्वी ही पर्सेन्टाईल आणि ९०:१० हे फॉर्म्युले वापरण्यात आले पण कोडे अजुन सुटले नाहीए. हायकोर्टाने मात्र हॅटट्रिक साधत या वर्षीही नापास होण्याचे सत्र चालू ठेवले. एस.एस.सी. आणि इतर बोर्डांची गुणांच्या बाबतीत अशी तुलना करणे योग्य नाहीच आहे. दोन्हींचे अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत वेगवेगळी अड्मिशन प्रक्रिया अवलंबण्याची गरज आहे. त्यावर कधी न कधी योग्य उपाय सापडेल अशी आश...

परीक्षा संपली !!!

Image
हुश्श ! संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ! ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो. मला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय ! म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच ! कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कध...