विकेट

क्रिकेट आणि आपले जीवन हे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी कुठे न कुठे जोडले जातात. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे हे होणे साहजिक आहे आणि भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विषयी चर्चा, वाद-विवाद हे नित्यनेमाने होत असतात. कुणी कशी कॅच घेतली, कुणी किती सिक्स मारले, कुणी किती मॅचेस जिंकल्या, कुणी किती विकेट्स काढल्या etc . क्रिकेटप्रेमी हल्ली एक नवीन वाक्प्रचार वापरू लागले आहेत तो म्हणजे 'विकेट जाणे'. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण कुण्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीला हल्ली विकेट जाणे असे क्रिकेटच्या शब्दकोशातील शब्द येऊ घातले आहेत. You Are OUT! काही दिवसांपूर्वी एका मित्राचा अपघात झाला आणि त्यातच गेला. मित्र म्हणजे फार जवळचा नसला तरी ओळखीच्यांपैकी होता आणि त्याचा अपघात असाच बाईकवर असताना झाला. बाईक अपघात हा काही नवीन प्रकार नाही. तारुण्यात प्रवेश केला कि प्रत्त्येकाला बाईक हवी असते. तरुणांना फक्त क्रेझ असते ती वेगाची, आपल्यापेक्षा फास्ट पळणाऱ्याला मागे टाकण्याची. या क्षुल्लक गोष्टीपायी सुद्धा कित्येकांनी जीव गमावले आहेत किंवा दुखापती करून घेतल्या आहेत. कशाला आपण या मोहात पडत र...