Posts

Showing posts from 2011

पत्रास कारण की...

Image
शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ? पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आ

फेसबुक चाट

संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत. मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो. पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन ! माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच... प्राची: हा....य!! मी: हेल्लो...! प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?) मी: एकदम मजेत...तू कशी आहेस? प्राची: आहेस कुठे तू? भेटत नाही, फोन पण नाही. मी: कामं आहेत ग...बिझी असतो आजकाल [:P] प्राची: माझ्यासाठी पण वेळ नाहीये का? मी: तो कसा नसेन...उलट तू ऑफीस सोडल्यापासून बोर होतंय ऑफीसमध्ये...[;)] प्राची: खरंच? अनघा: हाय स्वीटहार्ट....:)  मी: हाय डियर... :) (अजुन एक आली!)  अनघा: कसा आहेस ? [:P]  मी: एकदम मजेत (पुन्हा तेच...!)  अनघा: मला वाटले विसरलास मला...:(  मी: शक्य आहे का ते ? [:D]  अनघा: काय करतोस सध्या? कॉलेज मधले फ्रेण्ड्स भेटतात का कोणी?  मी: तुझ्याखेरीज कोणीच नाही...तुलाच तेवढी आठवण होते माझी [;)]  प्राची: हेल्लो...कुठे हरवलास...?  मी: अग इथेच आहे...म्हणजे हरवलो होतो तुझ्या

बालपणीचा खेळ सुखाचा

Image
या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे. पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप

दुसरा वाढदिवस

Image
गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही. तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही. पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच. वाढदिवसाच

'आर' फॉर रॉकस्टार

Image
"११.११.११"  जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो. पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. ' जो भी मैं कहना चाहू.. ' इथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची  (रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढ

मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

Image
तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप... या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते. (अवधूत गुप्ते ज्यांनी या चित्रपटाचे संगीत आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत त्यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले की 'मोरया' चित्रपट करायचा ठरला तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी ही लालबागच्या राजाची मिरवणूक रेकॉर्ड करायचे ठरवले. तब्बल १० तासाच्या रेकॉर्डिंग पैकी जेमतेम ५-६ मिनिटांची दृश्‍ये या चित्रपटात वापरली आहेत. परंतु ती प्रदीर्घ शूटिंग पाहताना कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक भाविकच्या चेहऱ्यावरील भाव, ढोल -ताशाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पाहताना आपणही हरवून जातो.) 'गणेश चाळ' आणि' खटाव चाळ' या मुंबईतील दोन जुन्या चाळी आणि तेथील २० वर्षांची परंपरा लाभलेले दोन गणेश मंडळे य

अस्वस्थ मनाचे किडे

माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. 'मन चिंती ते वैरी न चिंती' असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन करून सोडतो. याला आम्ही सभ्य भाषेत किडे म्हणतो कारण मनातल्या मनात ते वळवळ करत राहतात. ते असणे तसे फायद्याचेही असते नाहीतर माणूस आळशी आणि मंद बनत जातो. याउलट जो सतत काहीना काही विचारांनी अस्वस्थ राहतो तो पुढे पुढे जात राहतो. ( तत्त्वज्ञान पुरे !) आपल्याला हवे तसे वागण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी ती करता येईलच असे नाही. परीक्षेच्या दिवसात मला नेहमी वाटते की आपण परीक्षेला जातो असे सांगून कुठेतरी दुसरीकडेच फिरायला जावे. परीक्षा न देऊन होणारे नुकसान लक्षात घेतले की आपण शहाण्या मुलासारखे मनास मुरड घालतो. परीक्षा हॉल मध्ये गेलो कि मला नेहमी गाणी गुणगुणावीशी व

पाऊसगाणी

Image
जून महिना सुरु झालाय आणि पाऊस आता मुक्तहस्ताने बरसू लागलाय. उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीस तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदसोहळा सुरु झाला. पावसाच्या ओघानेच मग पाऊसगाणीही साऱ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली. कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. म्हणूनच पाऊसगाण्यांनी भिजलेला हा ओला लेख. पावसाचे वेड तर तसे सगळ्यांनाच आहे आणि तसेच पाऊसगाण्यांचेही. पण ब्लॉग मराठी असल्याने आणि मराठी भाषेवर आणि संगीतावर हिंदीहून जास्त प्रेम असल्याने आज केवळ मराठी पाऊसगाणीच ऐकुया. पावसावर कविताही असंख्य लिहिल्या गेल्यात पण त्यांची संख्या आणि उपलब्धता पाहता त्याच्यावर लिहिणे फारच कठीण आहे. म्हणून आपल्या आवडीची, मनोमनी रुजलेली व काही नवी पाऊस गाण्याची मैफिल आज ब्लॉगच्या दरबारी सादर करीत आहे. बालपणीचा पाऊस म्हटला कि सर्व प्रथम आठवणारे बालगीते म्हणजे - 'येरे येरे पावसा...' ज्या कुठल्या मराठी कुटुंबात हे गाणे पावसाकडे पाहून पालकांनी आपल्या चिमुकल्यांस शिक

सिरीयल कीलिंग

आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत. मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त

कलेचं देणं

कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पाहिले तर प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या कलेचे वरदान लाभलेले असते. महत्वाचे हे आहे की आपण त्या कलेला कसे जोपसतो ते. कित्येकांना आपल्या अंगी असणार्‍या कलेचे महत्त्वच कळत नाही. काहींना ते ठाऊक असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की कला हे देवाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जिथे आपण 'मी'पणा विसरून त्या कलेच्या धुंदीत हरवून जातो आणि या कलेतून मिळणारा आनंद ही स्वर्गीयच असतो, थेट ईश्वराशी भेट व्हावी असा. कला नक्की काय आहे? ती एक ईश्वरसेवा आहे, ती मनोरंजनासाठी आहे, समाजप्रबोधनासाठी आहे की केवळ पैसा कमवण्यासाठी आहे. ती याहून बरेच काही आहे. कलेतून पैसा कमावणे हा त्याच्या प्राथमिक हेतू तरी नक्कीच नाही. तरीही जे अगदीच गरीब आहेत, ज्यांचा उदरनिर्वाहच या कलेवर आहे, ज्यांना ती अमुक एखादी कला सोडून काही येत नाही त्यांनी आपला संसार चालवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कलेचा वापर केला तर त्यास काही एक हरकत नाही. बहुधा देवाने ती कला त्यांना यासाठीच दिली असावी.

मला भारतरत्न पाहिजे !

Image
बस...ठरलं ! आता अजून काही नाही...हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच...काय म्हणता ? मला कशाला...? छे छे...माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय...मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता...भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत. मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने द्विशतक केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्य

विकेट

Image
क्रिकेट आणि आपले जीवन हे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी कुठे न कुठे जोडले जातात. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे हे होणे साहजिक आहे आणि भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विषयी चर्चा, वाद-विवाद हे नित्यनेमाने होत असतात. कुणी कशी कॅच घेतली, कुणी किती सिक्स मारले, कुणी किती मॅचेस जिंकल्या, कुणी किती विकेट्स काढल्या etc . क्रिकेटप्रेमी हल्ली एक नवीन वाक्प्रचार वापरू लागले आहेत तो म्हणजे 'विकेट जाणे'. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण कुण्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीला हल्ली विकेट जाणे असे क्रिकेटच्या शब्दकोशातील शब्द येऊ घातले आहेत. You Are OUT! काही दिवसांपूर्वी एका मित्राचा अपघात झाला आणि त्यातच गेला. मित्र म्हणजे फार जवळचा नसला तरी ओळखीच्यांपैकी होता आणि त्याचा अपघात असाच बाईकवर असताना झाला. बाईक अपघात हा काही नवीन प्रकार नाही. तारुण्यात प्रवेश केला कि प्रत्त्येकाला बाईक हवी असते. तरुणांना फक्त क्रेझ असते ती वेगाची, आपल्यापेक्षा फास्ट पळणाऱ्याला मागे टाकण्याची. या क्षुल्लक गोष्टीपायी सुद्धा कित्येकांनी जीव गमावले आहेत किंवा दुखापती करून घेतल्या आहेत. कशाला आपण या मोहात पडत र