Posts

Showing posts from May, 2013

ब्रेक के बाद

Image
गेले कित्येक दिवस ब्लॉगवर काहीच खरडले नसल्याने फारच अस्वस्थ वाटत होते. ब्लॉग लेखनाचा छंद असा आहे की बराच काळ लिहिले नाही म्हणजे अपराध केल्यासारखे वाटू लागते. त्यात इतर ब्लॉगर मित्रही झोपी गेल्याने अधिकच कंटाळा आला होता. पण शेवटी मौन सोडायचे ठरवले आणि ब्रेक नंतर परत यायचे ठरवले. गेली दोन्ही वर्षे परीक्षेमुळे गावी जाण्याचा योग आला नव्हता आणि यंदा अस्मादिकांच्या कुठल्याच परीक्षा नसल्याने ही संधी साधत खुशाल दहा दिवस सुट्टी टाकली आणि गावाकडे निघालो. गावी गेलो की हमखास पत्त्यांचे डाव रंगणारच. गावचे घर आणि पत्ते यांचा वर्षानुवर्षांचा संबंध आहे. आम्ही सगळी भावंडे वर्षभर पत्त्यांकडे ढुंकूनही पाहत नाही आणि गावी आल्यावर मात्र पत्ते एके पत्ते. हल्ली पूर्वीची चिल्लर गँग मोठी झाल्याने 'तुला काही येत नाही' असं सांगून कटवताही येत नाही. प्रत्येकाने एक-दोन सेट आणल्याने गावी दहा-बारा कॅट जमले होते यंदा. सगळ्यात आवडते म्हणजे रमी आणि मेंढीकोट. बरेच कॅट असल्याने चॅलेंज सुद्धा रंगायचे. शिवाय गावी काही गोट्यांच्या बरण्या सापडल्या तेव्हा मग तीन-पानी सुद्धा सुरु झाले. गोट्या सापडल्या त्यामुळे परत एकद