Posts

Showing posts from July, 2013

इस्टमन कलर दुनियादारी

Image
बहुचर्चित दुनियादारी एकदाचा प्रदर्शित झाला. दुनियादारी ही सुहास शिरवळकर याची एक अजरामर कादंबरी आहे याची प्रथमत: सर्वांनी नोंद घ्यावी. दुनियादारी पाहून आलेल्या अनेकांना हे माहीतच नाहीये त्यामुळे दर्जा काय असतो हे त्यांना चित्रपट पाहून कळणार नाही. या चित्रपटाचे परीक्षण करायचे म्हटले तर दोन प्रकारे करता येईल- एक म्हणजे केवळ चित्रपट म्हणून व दुसरे म्हणजे कादंबरीवर आधारित चित्रपट म्हणून. पण इथे लेखकाने (म्हणजे मी) पुस्तक आधीच वाचले असल्याने चित्रपट पुस्तकावर आधारित आहे हे सत्य त्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या लेखात वारंवार चित्रपटाची पुस्तकाशी तुलना केली जाईल पण काही उपाय नाही. दुनियादारी ही कथा आहे श्रेयस, मिनू, शिरीन, दिग्या, रानी माँ, एम के आणि कट्टा गँगची. कॉलेज, मैत्री, प्रेम, विरह, संघर्ष असे नाट्यमय कथानक असल्याने साहजिकच संजय जाधव यांना दुनियादारी पडद्यावर आणावीशी वाटली त्यात काही आश्चर्य नाही पण ते तसे करताना मूळ कथानकात हवे तसे बदल करत ती सादर केली आहे. (ज्याला माध्यम बदलाची गरज असे म्हणता येईल). आणि सामान्य प्रेक्षकाने पुस्तक वाचले नसल्याने तो मूर्ख ठरतो कारण जे दाखवले

बीईंग स्कॉलर

Image
आयुष्यात कधी आत्मचरित्र लिहिले तर त्यातील शैक्षणिक कारकीर्दीत लिहिण्यासारखे बरेच काही आहे. पुढील लेख हा त्यातीलच एक उतारा म्हणता येईल. लेखात मांडलेले सर्व विचार स्वानुभवावरून लिहिले असून ते काल्पनिक मुळीच नाहीयेत. 'स्कॉलर' ही काही पदवी किंवा गौरव नाहीये. तो एक शिक्का आहे जो स्वकर्तृत्वाच्या पूर्वपुण्याईने मिळत असतो. जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मला कायम 'स्कॉलर' 'गुणी मुलगा' 'अभ्यासू मुलगा' अशा अगदी 'टाइड' ने धुतलेल्या पांढर्या कपड्याइतकी स्वच्छ प्रतिमा लाभली आहे. मी काही वाईट बोललो किंवा वागलो की मला असे वागणे शोभत नाही, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे बरेच काही ऐकून घ्यावे लागते. थोडक्यात स्कॉलर असणाऱ्या मुलांना सगळ्यांनी 'गुड बॉय'चा शिक्का मारून ठेवलेला असतो आणि त्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. स्कॉलर इमेज टाळण्याचा प्रयत्न करणे फार कठीण काम आहे. म्हणजे स्कॉलर लोकांच्या चेहऱ्यावरच ते तेज किंवा तो दोष असतो. शाळेत तर सगळे शिक्षक मुलांना व्यवस्थित ओळखून असतातच. अमुक एक मुलगा हुशार आहे कळल्यावर त्या मुलाला अभ्यास न करण्याचा पर्या