Posts

Showing posts from January, 2010

स्वप्नांचे जग

Image
डोळे उघडले ते आईच्या आवाजाने. रविवारची सकाळ म्हणजे बर्‍याच आरामशीर उठण्याचा कार्यक्रम. तसे रोज काही फार लवकर उठतो अशातला भाग नाही. पण निदान आठवड्यातून एक दिवस तरी झोपेतील स्वप्ने अर्धवट राहत नाहीत. नाहीतर बाकीचे सहा दिवस म्हणजे साखर झोपेची वेळ, स्वप्न ऐन रंगात आलेले आणि नेमका त्यावर अलार्मचा खणखनाट !
स्वप्ने पाहायला तशी प्रत्येकालाच आवडतात. मला तर झोपेत असंख्य स्वप्न पडत असतात अन् तेही दररोज. ह्या माझ्या मनाचे मला काही करता येत नाही. निवांत झोपावे म्हणाव तर झोपेतही सतत काही ना काही खटपट चालू. हा स्वप्नांचा कारभार गेली कित्येक वर्षे चालू आहे ( अर्थात इतके काही वय नाही झाले माझे...!) म्हणजे फार लहान होतो तेव्हा मला कधी झोपलो अन् जागा कधी झालो हे कळत नव्हते. पण फार लवकरच मी विचार करायला लागलो आणि ही भलतीच दुनिया सापडली...
निद्रितावस्थेतील स्वप्नांबद्दल हल्लीच माझ्या वाचनात आले की माणसाला नेहमी पहाटे पडलेली स्वप्नेच आठवतात. अपवाद फक्त त्या स्वप्नांचा जेव्हा रात्री आपण अचानक दचकून जागे होतो. अन्यथा झोपेतून उठल्या नंतर माणूस ५ मिनिटा पर्यंत ५० % स्वप्न विसरून जातो आणि १० मिनिटा पर्यंत ९०% वि…