Posts

Showing posts from July, 2010

वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)

Image
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते) आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता

समानतेचा निकष

आपल्या देशात नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवयच लागली आहे. एस.एस.सी.बोर्डाचे निकाल लागले आणि यंदा अपेक्षेहून अधिक मार्कांची उधळपट्टी झाली. मुले टेन्शन घेतात, आत्महत्या करतात म्हणून सढळ हाताने गुणवाटप करण्यात आले. सर्वत्र आनंदी-आनंद झाला. आता महत्वाचे काम- मिशन अड्मिशन. आणि अकरावी प्रवेशासाठी एस.एस.सी. बोर्डाप्रमाणे, सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. बोर्ड ही रांगेत उभे राहीले. दरवर्षी प्रमाणे इतर बोर्डाचे विद्यार्थी रांगेत पुढे आणि आपले मराठमोळे विद्यार्थी मागे!. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का? या एस.एस.सी. बोर्डाच्या प्रश्नावर शिक्षणखात्यास आणि हायकोर्टास अजूनही उत्तर सापडले नाही. या पूर्वी ही पर्सेन्टाईल आणि ९०:१० हे फॉर्म्युले वापरण्यात आले पण कोडे अजुन सुटले नाहीए. हायकोर्टाने मात्र हॅटट्रिक साधत या वर्षीही नापास होण्याचे सत्र चालू ठेवले. एस.एस.सी. आणि इतर बोर्डांची गुणांच्या बाबतीत अशी तुलना करणे योग्य नाहीच आहे. दोन्हींचे अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत वेगवेगळी अड्मिशन प्रक्रिया अवलंबण्याची गरज आहे. त्यावर कधी न कधी योग्य उपाय सापडेल अशी आश

परीक्षा संपली !!!

Image
हुश्श ! संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ! ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो. मला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय ! म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच ! कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कध