माझी आजारपणे

आजारपण काही कुणाला सांगून येत नाही, ते येते अनपेक्षीतपणे, एखाद्या वादळी वार्याप्रमाणे. ते येते, जे काही सुरळीतपणे चालले आहे ते बिघडवते आणि आपण हताशपणे पाहत राहतो. मग पुन्हा नव्याने सुरूवात... आजारपण म्हणजे नुसतेच बेडवर पडून राहणे असते तर एक वेळ ठीक होते पण आजारपण त्यासोबत औषध व गोळयांची फौजही घेऊन येते. मला या एका कारणासाठीच आजारपण आवडत नाही. आतापर्यंत आजारपणातील औषध आणि गोळयांच्या एवढ्या बाटल्या मी रिचवल्या आहेत की मी एखादे केमिस्टचे दुकान टाकून फावल्या वेळात त्या खात बसायला हव्यात. या बाबतीत ही मी थोडा आळशीच आहे. आतापर्यंत कोणत्या आजारावर कोणत्या गोळ्या खाव्यात याची काही नोंद ठेवली असती तर डॉक्टर भेटीचा योग सारखा-सारखा आला नसता. निदान पार्टटाइम जॉब म्हणून आमच्याकडे अमुक-तमुक आजारावर औषधे मिळतील असा बोर्ड ही लावता येईल. पूर्वीच्या काळी बायकांनी बाळंतपणाच्या गोष्टी सांगाव्या अशी बरीच बाळे त्यांना असत. त्या एकदा सुरू झाल्या की अनेक आठवणी निघत. माझ्या बाबतीतही अशी अनेक आजारपणे झाल्याने मला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्या प्रत्येक आजारपणाची काही लेखी नोंद ठेवली असती तर एव्हान...