वेळ न उरला हाती...

वेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून वेळेचा अपव्यय करत राहतो आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा बोलतो.''अरे वेळच नाहीए रे...!'' खरं तर एवढ्या दिवसांनी ही पोस्ट आली यावरून तुम्ही ओळखले असेलच की माझ्याकडे वेळ किती कमी आहे ( म्हणजे फिल्मी स्टाइलने म्हणत नाहीए...पण माझ्या विचारांच्या मौलिक संशोधनातून( किंवा मौलिक विचारांच्या संशोधनातून) मला कळून चुकले आहे की मी किती ही वर्षे जगलो तरी मला वेळ कधी पुरणार नाही) आणि त्याची कारणे किंवा सबबी देऊन मी लिहिण्याची टाळाटाळ करतोय असे समजू नये. लिहिणे हे माझ्या ( रिकाम्या वेळेतील) आवडत्या छंदांपैकी एक. पण या ना त्या कारणाने ते जमत नाही अन् मी वेळेला मारण्याऐवजी वेळच मला मारुन नेते. माझे इतर ब्लॉगर मित्र दिवसा-दिवसाला धडधड पोस्ट टाकत असताना मला त्या वाचायला ही वेळ मिळत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो(!) आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते(!!) मग मी मोठ्या निर्धाराने ठरवतो की उद्याच नवी पोस्ट टा...