सानियाच्या लग्नाला

हो-नाही म्हणता म्हणता अखेर सानियाचे लग्न झाले आणि ते ही शोएबशीच झाले. बाकी सर्व न्युज चॅनेल्सनी, वर्तमानपत्रांनी आणि तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनीही तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाह करण्याचा शक्यतोवर, शक्यतोपरी निषेध केला पण अखेर नदी सागरास मिळाली. ती भारतीय सागरास न मिळता पाकिस्तानाकडे वळली याचेच तमाम भारतीयांना दु:ख. तर तिकडे पत्रकार आणि बातमीदारानी या एका बातमीचा उदो-उदो करीत टीआरपी खायला सुरूवात केली.
एकीकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याचे उपदेश पाजतो आणि तेच अगदी सहजपणे विसरूनही जातो. सानिया मिर्जा मोठी टेनिसपटू म्हणून तिच्या लग्नाचा एवढा गाजावाजा. तिने कुणाशी लग्न करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण सारे तिच्यावर हक्क गाजवल्याप्रमाणे तिच्या लग्नाच्या विरोधात उभे. आपल्याला कुणी हक्क दिला ? ती भारतासाठी खेळते, टेनिसमध्ये भारताला नावलौकिक मिळवून देते म्हणून का? आणि मुळात एवढी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीच जर तिचे लग्न शोएबशी झाले असते तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता. तिने शोएबशी लग्न करो वा शाहीदशी करो पण न्युजवाल्यांना निमित्तच हवे असते- ब्रेकिंग न्युज!' मग तिच्या घरातले आई-वडील असो वा पाकिस्तानची आयेशा असो सगळेच 'लाइम-लाईट मध्ये'आणि ' नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' आणून काय मिळवले न्युजवाल्यांनी तर टीआरपी ! या फुटेजचा काही अवॉर्ड मिळाला का त्यांना ? पण सेलीब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याला चव्हाट्यावर आणायचे काम यांना बरोबर जमते ( त्यांचे स्व:तचे आयुष्य आणि भानगडी असे चॅनेलवर दाखवले तर चालेल का? पण यालाही तयार होणारे सापडतील. कारण प्रसिद्धी मिळते तर सगळे चालेल.) आणि लोक पाहणार हे त्यांना ठाऊक असते म्हणून ' जे विकते तेच पिकवतात' आणि पक-पक-पकवतात.  टी.व्ही. सीरीयल आणि न्युज चॅनेल्स दोन्हीमध्ये टीआरपी वाढवण्याची शर्यत सुरू आहे आणि प्रेक्षक वर्ग मात्र भरडला जातोय.
मी या सर्व गोष्टींकडे त्रयस्थपणे पाहतो. सानिया एक चांगली खेळाडू आहे आणि शोएबशी लग्नानंतर ती पाकिस्तानात जाणार असली तरी तिने भारतातर्फे खेळणे सोडू नये एवढीच इच्छा आहे.
(पोस्ट थोडी शिळी झालीय खरी पण फोडणी दिलेल्या बातम्या चालतात मग पोस्ट का चालू नये ?)

प्रतिक्रिया-

Samir Said-
Sania may marry anyone... and may go anywhere. It hardly matters if she is playing for India or not. India has capacity to produce 100s such Sania. Its Sania Because of India and not vice a versa.

Sagar Said-
Ya That's true also...
But media really makes these thigs a big issue that's not at all necessary.

Comments

Popular posts from this blog

पाऊसगाणी

निषेध!निषेध!!

दुनियादारी ! दुनियादारी !!