गणेश विसर्जन सोहळा
गणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल. गेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आ...