खो-बाई-खो

मिळाला एकदाचा खो! गेल्या आठवड्यात सुहासने खो दिला आणि मग 'आलिया भोगासी असावे सादर' प्रमाणे ही पोस्ट करायची वेळ आली. सर्वप्रथम ब्लॉग विश्वात हे खो-खो चे प्रकार चालू झाले तेव्हा वाटले की आपण काही या जाळ्यात अडकणार नाही पण खो-खो ची साथ वेगाने पसरत चालली आहे आणि जो तो आपला खोकत बसलाय.
अनुवादासाठी मी कोणते गाणे निवडावे हा एक मोठा प्रश्न पडला होता...बरीच उलथापालथ केल्यानंतर एक गाणे निवडले जे माझे खूप आवडते आहे. 'प्यार का मौसम' या चित्रपटातील 'तुम बिन जाऊ कहाँ'. हे गाणे किशोरदा आणि रफीसाहेब दोघांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे आणि वेगवेगळ्या कडव्यांसह रेकॉर्ड झाले आहे.
अनुवाद करायचा असला तरी अगदी शब्द:शह अनुवाद न करता तो अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा या प्रयत्नास नक्की प्रतिसाद द्या.
एक विनंती अशी की कृपया गाण्याच्या मूळ चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा सुचेल त्या चालीवर गा.

मूळ गीत-

मोहम्मद रफ़ी-

तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके
कुछ ना फिर चाहा कभी तुमको चाहके, तुम बिन ..

देखो मुझे सर से कदम तक, सिर्फ़ प्यार हूँ मैं
गले से लगालो के तुम्हारा बेक़रार हूँ मैं
तुम क्या जानो के भटकता फिरा
मैं किस गली, तुमको चाह के ..

अब है सनम हर मौसम, प्यार के काबिल
पड़ी जहाँ छाव हमारी, सज गयी महफ़िल
महफ़िल क्या तनहाई में भी
लगता है जी, तुमको चाह के ..

किशोर कुमार-

तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके
कुछ ना फिर चाहा कभी, तुमको चाहके, तुम बिन ..

रह भी सकोगे तुम कैसे, हो के मुझसे जुदा
ढह जाएँगी दीवारें, सुन के मेरी सदा
आना ही होगा तुम्हें मेरे लिए
साथी मेरे, सुनी राह के ..

कितनी अकेली सी पहले, थी यही दुनिया
तुमने नज़र जो मिला ली, बस गई दुनिया
दिल को मिली जो तुम्हारी लगन
दिए जल गए, मेरी आह से ..

देखो मेरे गम की कहानी, किसीसे मत कहना
कहीं मेरी बात चले तो, सुनके चुप रहना
मेरा क्या है कट जाएगी कहीं
ये ज़िंदगी, तुमको चाह के...

अनुवाद-

तुझ्याविना जाऊ कुठे?
की या जगात येऊन प्रेम न केले कुणावरी
तुझ्याविना...

बघ माझ्याकडे एकदा...फक्त प्रेम आहे मी
मिठीत घे न एकदा...किती अधीर आहे मी
कुठे-कुठे भटकत फिरलो प्रेमात तुझ्या
तुझ्याविना...

आता प्रत्येक ऋतू प्रेमाचे रंग भरतील
तुझ्या सावलीत सजली प्रेमाची मैफिल
आठवणी तुझ्या पुरतील मला जरी असलो
तुझ्याविना...

माझ्याविना तू तरी राहशील कशी?
तोडून सारी बंधने येशील माझ्यापाशी
यावे लागेल तुला माझ्यासाठी
मी ही तडपतो आहेच ना
तुझ्याविना...

किती एकटा होतो मी तुझ्याविना
तुझ्या येण्याने बघ बहरली दुनिया
आता तुझ्या प्रेमानेच दिशा गवसली
नाहीतर अंधारच होता
तुझ्याविना...

माझे दु:ख माझ्याकडेच राहू दे
माझ्या आठवांना अश्रूंतून वाहू दे
माझे आयुष्य जाईल सहज
तुझ्या आठवणीत
तुझ्याविना...


आता खो द्यायची माझी पाळी. खो देण्याआधी काही भन्नाट गाणी अनुवादासाठी सुचवावी असे वाटले म्हणून यातील एखाद्या गाण्याचा अनुवाद वाचायची माझी फार इच्छा आहे.
१. आहून आहून आहून...
२. झूबी डूबी झूबी डूबी
३. तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार...( सगळे आपले इमोसनल अत्याचार लिहित होते मग याच गाण्याचा का नाही करत अनुवाद?)

तर ब्लॉग विश्वात असणार्‍या माझ्या ओळखीच्या मित्रांपैकी बहुतेकांना आधीच खो मिळाला असल्याने माझ्याकडे काही पर्याय नव्हते म्हणून माझा खो जात आहे- दि वन अँड ओन्ली- विक्रांत देशमुख यास. बेस्ट लक विक्रांत.

Comments

 1. माझे दु:ख माझ्याकडेच राहू दे
  माझ्या आठवांना अश्रूंतून वाहू दे
  माझे आयुष्य जाईल सहज
  तुझ्या आठवणीत...


  मस्तच आणि खो चुकवला नाहीस म्हणून थॅंक्स :)

  ReplyDelete
 2. आभार रे सुहास...

  ReplyDelete
 3. Sagar,
  I am tied up with some project delivery till Wednesday. Can I do it on Thursday??
  I will write it without fail.

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी