प्रेमात पडतो जो तो...

प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना. आपल्या आवडत्या व्यक्तीशी असणारे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते यात त्या दोन जीवांना जोडणारा दुवा म्हणजे प्रेम. आपण प्रेम कुणावरही करू शकतो पण तरीही प्रेम म्हटले की प्रथम आपल्याला आठवतात ते दोघेच-प्रियकर आणि प्रेयसी. प्रेमात पडल्यावर कसे सर्व जग रंगीबेरंगी वाटू लागते. आपल्यावर प्रेम करणार्या किंवा आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचे बोलणे, हसने, तिचा आवाज, तिचे असणे-नसणे सगळ्याला खूप जास्त महत्त्व मिळायला लागते आणि तिच्या शिवाय या जगात काहीच सुंदर भासत नाही. तिच्याच आठवणीत रमू लागतो, तिच्याच भोवती घुटमळू लागतो. ती म्हणजे प्रेम, ती म्हणजे आयुष्य, ती म्हणजे सर्वस्व. प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कविता सुचू लागतात. कित्येकांना गाणीही सुचू लागतात किंवा निदान आपण बरे गातो असे भास तरी होतात कारण प्रेमात पडल्यापासून बरीच रोमॅंटिक गाणी गुणगुणायला सुरूवात झालेली असते. आपल्या मोबाईल मध्ये तिला आवडणारी गाणी ठेवली म्हणजे बरेच फायदे होतात. एकतर आपले महत्त्व फार वाढते शिवाय गाणी ऐकण्याच्या निमित्ताने आपल्याला तिची कंपनीही मिळते. त्यात ही जर एक हे...