मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप... या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते. (अवधूत गुप्ते ज्यांनी या चित्रपटाचे संगीत आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत त्यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले की 'मोरया' चित्रपट करायचा ठरला तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी ही लालबागच्या राजाची मिरवणूक रेकॉर्ड करायचे ठरवले. तब्बल १० तासाच्या रेकॉर्डिंग पैकी जेमतेम ५-६ मिनिटांची दृश्ये या चित्रपटात वापरली आहेत. परंतु ती प्रदीर्घ शूटिंग पाहताना कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक भाविकच्या चेहऱ्यावरील भाव, ढोल -ताशाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पाहताना आपणही हरवून जातो.) 'गणेश चाळ' आणि' खटाव चाळ' या मुंबईतील दोन जुन्या चाळी आणि तेथील २० वर्षांची परंपरा लाभलेले दोन गणेश मंडळे य...