पत्रास कारण की...

शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ? पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आ...