कार्टून नेटवर्क-रिलोडेड

माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया. कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी' . गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत....