रक्तरंजीत पुस्तक

नुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये.
सचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस !
एरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे चाहत्यांप्रती प्रेम नक्कीच व्यक्त होत नाही आणि शिवाय त्याची अवाजवी किंमत हे तर अजुनच सलनारी गोष्ट आहे. म्हणजे सचिन वर प्रेम करण्याचा हक्क हा श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-पातीची सर्व बंधने मोडणारा असता असे एखादे पुस्तक फक्त श्रीमंतांना खरेदी करता येईल अशा किमतीला मिळावे हे तमाम भारतीयांना न आवडण्यासारखे आहे. (तरी बरे सचिनने ही जाहीर केले की त्या पुस्तकासाठी त्याचे रक्त वापरण्यात आले नाही आणि ते त्याचे आत्मचरित्र नसून केवळ छायाचित्रांचे पुस्तक आहे.) मुळात सचिन सारख्या व्यक्तीला प्रसिद्धीसाठी असल्या कुबड्यांची कधीच गरज भासत नाही. त्याचे कर्तृत्वच त्याची थोरता सांगते.
पण सचिनच्या रक्ताचे काही थेंब वापरले हे कारण पुस्तकास प्रसिद्धी मिळवून देण्यास पुरेसे आहे हे पुस्तक छापणार्‍यांस ठाऊक आहे आणि हे सारे न करता ही सचिनचे पुस्तक त्याच्या चाहत्यांनी मिळेल त्या किमतीला घेतले असते. पण नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊन हे लोकच चुकीचे 'ट्रेण्ड' रुजू घालत आहेत. सचिनवर त्याच्या चाहत्यांचे असणारे प्रेम आणि चाहत्यांप्रती सचिनची असणारी बांधीलकी सिद्ध करण्यासाठी असले अमानवी प्रकार करायची बिलकुलही आवश्यकता नाही.पण हे सगळे त्या प्रकाशकांना कोण समजावणार ?याहून खटकणारी गोष्ट म्हणजे आपण सगळेच या विषयाला सचिनची महानता आणि त्याच्या सोनेरी आयुष्याचे क्षण टिपणारे पुस्तक म्हणून ते इतके महाग असे समजत आहोत पण सचिन सारख्या हिर्‍याची कशाशी ही तुलना होऊ शकत नाही मग ते ३२ लाखाचे पुस्तक का असो?
सहज मनात आले म्हणून सांगावेसे वाटते की २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कित्येक जवाणांनी प्राण गमावले, रक्त सांडले. त्यांच्या रक्ताची किंमत काय? देशासाठी रक्त सांडणारे तसेच गेले. कुणाला त्यांची पर्वा नाही, त्याच्या रक्ताचे मोल नाही.काही दिवस आपण श्रद्धांजली वाहिली, आसवे गाळली आणि पुन्हा आहे तसेच सुरू. त्यांचेच का ? सीमेवर आजपर्यंत कित्येक सैनिकांनी देशासाठी रक्त वाहीले पण त्यांच्या रक्ताची किंमत कोणी केली ? आपल्याला फक्त सचिनच्या रक्ताचीच किंमत का? त्याने रक्त दिले या बातमीवर लगेच सर्वत्र निषेध जाहीर झाला, टीका झाली आणि त्याची ब्रेकिंग न्युज ही झाली.पण नक्षलवाद्यान्शी लढणार्‍या सैनिकांच्या बलदानाची कुणाला पर्वा? आपल्याला कुणा शहीद अधिकार्‍याचे जॅकेट सांभाळता येत नाही मग आपल्याला त्याच्या पराक्रमाचे गोडवे गाण्याचा तरी काय अधिकार? मग सचिनने एक थेंब रक्त सांडो वा बाटलीभर रक्त सांडो काय फरक पडतो?
पण हे सारे असेच चालू राहते. ज्या बातम्या खळबळ माजवतात त्यांना महत्त्व द्यायचे मग त्या तितक्या महत्त्वाच्या असो वा नसोत आणि त्यासाठी कुठल्याही ठरला जायची तयारी असते लोकांची. एक गोष्ट मात्र नक्की आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही ठरला जातात आणि काहीही अफवा पसरवतात.सचिन बाबत अशा अनेक अफवा पसरवण्याचा या आधीही प्रयत्न झाला आहे पण त्याच्या चाहत्यांचा त्याच्या वरील विश्वास नेहमीच अढळ आहे आणि या वेळीही तो सार्थ ठरवत सचिनने सर्वांना दिलासा देत या बातमीस पूर्णविराम दिला.

प्रतिक्रिया-


Sharayu Said-
रक्तासारखा अनमोल पदार्थ अशाप्रकारे वाया घालविला जाऊ नये.

Sagar Said-
रक्त खवळले म्हणूनच लिहिले...रक्त ही काय पुस्तकाची शोभा वाढवण्याची गोष्ट आहे?

Comments

 1. रक्त मिश्रित पाने.. ३२ लाख.. मूर्खपणाचा कळस आहे नुसता !

  ReplyDelete
 2. नाहीतर काय...?
  प्रसिद्धीसाठी काय करतील नि काय नाही?

  ReplyDelete
 3. मस्त झाल आहे post what u hv quoted s v true
  प्रसारमाध्यमासाठी २ दिवसाच खाद्य

  ReplyDelete
 4. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दर्शना...
  आजकाल न्युज चॅनेलही टीआरपी च्या मागे लागलेत आणि काय विकते तेच ते पिकवतात.

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी