गणेश विसर्जन सोहळा

गणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्‍या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल.
गेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आपल्या मंडळाचे नाव मोठे करू पाहत आहेत. त्याच्या जोडीला चल-चित्रे आणि इतर आकर्षक सजावट करून लोकांचे डोळे दिपवू पाहत आहेत. आजही गणेशोत्सवात लोकांच्या भेटी-गाठी होतात पण प्रचंड आकाराच्या मूर्त्या तयार करून त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करण्याची जबाबदारी कोणीही घेत नाहीयेत. ती जबाबदारी सर्वत: समुद्रावर सोपवून सगळे मोकळे झालेत.
या अजस्त्र आकाराच्या मूर्त्या विसर्जन करतेवेळी कित्येकदा बळजबरी ढकलल्या जातात आणि प्रसंगी पायाने ही ढकलण्यात येतात. म्हणजे ज्या देवाची १० दिवस पूजा करायची त्यालाच काही केल्या समुद्रात ढकलून यायचे. त्यातील कित्येक मूर्त्या मग पुढील काही दिवसात किनार्‍यावर परततात त्याही छिन्न-विछिन्न अवस्थेत. मग कशाला करायचे असे विसर्जन? सर्व काही सामावून घेतो म्हणून सागरात आपण हे सारे टाकणार असु तर ते परत आले तर हळहळ का? त्या परतने साहजिकच होते कारण आपण मर्यादा न जाणता सर्व काही करत राहतो. आणि विसर्जन झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली का? त्यानंतर चौपाटीची होणारी अवस्था पाहायला आपण कशाला जायचे? आणि आपण विसर्जित केलेला गणपती लाटाबरोबर परत आला असेल का अशी शंका ही आपल्या मनात येत नाही. म्हणूनच मग असे फोटो पाहून वाईट वाटते.
शक्यतो गणेश मूर्त्या लहान आकाराच्या आणि सहजपणे विसर्जित होतील अशा आणाव्या आणि त्या तलाव किंवा कृत्रिम तळ्यात विसर्जित केल्या जाव्यात. मूर्तीच्या आकारानुसार आपली भक्ती ठरत नसते ही जरूर लक्षात घ्यावे. आपल्या बाप्पाची प्रतिष्ठा आपल्याच हातात आहे. तिची चेष्टा होऊ देऊ नका एवढेच सांगतो.

Comments

  1. hi sagar,i agree with u लोकमान्य टिळकांनी उदात्त हेतू ने सुरु केलेल्या गणेश ऊत्सवा मागच मुळ च आपण विसरत आहोत.आणी श्रद्धे पेक्श श्रिमन्ति च प्रदर्शन च होत आहे.रोशणाई, बण्ड, देखवे यावर नको तितका पैसा खर्च होत आहे.
    खेद या च कि कोणत्या ही मन्डलल समाज सेवा करावी वाटत नाही. वायफ़ल खर्च करतना भुकेल्याची आठवण होत नसेल??
    गणपती पुढे नाच गाणी कारण्यापेक्शा समाज हित कारक काम करु या मग खर्या अर्थाने गणपती ऊत्सव साजरा होईल.

    ReplyDelete
  2. खरच बघवत नाही हा विडियो… सुरुवात तर झाली आहे बरयाच ठिकाणी इकोफ़्रेंडली मुर्तीची किंवा दरवर्षी तीच मुर्ती वापरायच…लवकरच सर्वांना हया गोष्टीचे भान यावे ही बाप्पाकडॆ प्रार्थना…बाकी गणेशोत्सव हा अनेकजणांसाठी प्रचंड उर्जेचा स्रोत आहे, हे ही लक्षात घ्यावे...

    ReplyDelete
  3. १००% सहमत, श्रद्धा महत्त्वाची

    ReplyDelete
  4. @ दर्शना
    ब्लॉगभेटी बद्दल आभार.
    मूळ हेतू भरकटत चाललाय हे खरे...नको त्या गोष्टींना फार महत्त्व दिले जातेय
    गोकुळाष्टमीमध्ये ही हेच होतेय हल्ली.

    ReplyDelete
  5. @ देवेन
    हो रे...इकोफ्रेंडली मूर्त्यांची खरच गरज आहे सध्या.

    ReplyDelete
  6. @ गौरव
    पूर्वी गावाकडे चालणारे गणेशोत्सव फार छान होते.
    शहरीकरणात विसर्जनाची फार गैरसोय होते आहे

    ReplyDelete
  7. सागरा, अगदी बरोबर. पण जे तू फोटो टाकले आहेस ते खूप जुने आहेत. सध्या विसर्जनानंतर दोन दिवस स्वयंस्वेयी संस्था अश्या मूर्त्यांचे विसर्जन करतात आणि कोणाला त्या काळात किनार्‍यावर येऊ दिले जात नाही. मी स्वत: त्या संस्थेला मदत केली होती मागच्या वर्षी...

    ReplyDelete
  8. असे असेल तर आनंदच आहे...
    पण वाईट वाटले हे पाहून म्हणून टाकली पोस्ट...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा