रिऍलिटी शो जिंकायचाय ?

हल्ली सगळीकडे रिऍलिटी शो ची चलती आहे. प्रत्येक चॅनेलवर एक तरी रिऍलिटी शो आहेच. काही वर्षापूर्वी जिथे डेलीसोप्सने कब्जा केला होता तिथे आता रिऍलिटी शो ने त्यांची जागा बळकावली आहे. गायन, नृत्य, अभिनय, विनोद यांच्याबरोबरच अनेक विषयांवर रिऍलिटी शो सुरू झाले आहेत. त्यात क्वीज कॉंटेस्ट, कुकिंगपासून वेट लूसिंग पर्यंत बर्याच विषयांनी घुसखोरी केली आहे. आणि विशेष म्हणजे लोकांना हे पाहायला आवडत आहेत.कॉलेजगोइंग क्राउड पासून ते ऑफीसमधल्या स्टाफ पर्यंत सर्वत्र याची चर्चा चालू असते. रिऍलिटी शो मधले स्पर्धक ही रातोरात स्टार होऊन जातात. इतक्या कमी वेळात प्रसिद्धी मिळत असेल तर कोणाला नको आहे. म्हणून या स्पर्धांमध्ये भाग घेऊन झटपट नाव कमवायच्या हेतूनेच सर्व जण इथे रांगा लावतात. एकदा टी. व्ही. वर झळकलो की पुढचा मार्ग सोपा होऊन जातो आणि त्याहून पुढे जर ती स्पर्धा जिंक्लो तर लॉटरीच लागली. रिऍलिटी शो जिंकण्यासाठी काय करावे लागते? तसा तर काही १००% यशस्वी होणारा फॉर्म्युला यासाठी नाहीये पण जर तुम्ही किंवा तुमचे मित्र, नातेवाईक या स्पर्धेत भाग घेत असतील तर काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या. तुम्हाला रिऍलिटी शो...