विकेट

क्रिकेट आणि आपले जीवन हे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी कुठे न कुठे जोडले जातात. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे हे होणे साहजिक आहे आणि भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विषयी चर्चा, वाद-विवाद हे नित्यनेमाने होत असतात. कुणी कशी कॅच घेतली, कुणी किती सिक्स मारले, कुणी किती मॅचेस जिंकल्या, कुणी किती विकेट्स काढल्या etc . क्रिकेटप्रेमी हल्ली एक नवीन वाक्प्रचार वापरू लागले आहेत तो म्हणजे 'विकेट जाणे'. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण कुण्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीला हल्ली विकेट जाणे असे क्रिकेटच्या शब्दकोशातील शब्द येऊ घातले आहेत.

You Are OUT!
काही दिवसांपूर्वी एका मित्राचा अपघात झाला आणि त्यातच गेला. मित्र म्हणजे फार जवळचा नसला तरी ओळखीच्यांपैकी होता आणि त्याचा अपघात असाच बाईकवर असताना झाला. बाईक अपघात हा काही नवीन प्रकार नाही. तारुण्यात प्रवेश केला कि प्रत्त्येकाला बाईक हवी असते. तरुणांना फक्त क्रेझ असते ती वेगाची, आपल्यापेक्षा फास्ट पळणाऱ्याला मागे टाकण्याची. या क्षुल्लक गोष्टीपायी सुद्धा कित्येकांनी जीव गमावले आहेत किंवा दुखापती करून घेतल्या आहेत. कशाला आपण या मोहात पडत राहतो ? आपल्या सुरक्षिततेहून का महत्त्वाचे आहेत हे खेळ? आपल्याला मनावर, आपल्या वेगावर का नाही नियंत्रण ठवत आपण ? पण तरुणाई असते आपल्याच धुंदीत! तिला कशाची पर्वा नसते, तिला फक्त आनंद लुटायचा असतो. हायवे रोड वर नेहमी लिहिलेले आढळते -'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक'. कारण बहुतेक अपघात हे वेगावर नियंत्रण न ठेवल्यानेच होतात. आपल्याला एका क्षणभरासाठी मिळणारा आनंद हा आपल्याला एका मिट्ट काळोख्या वाटेकडे नेऊ शकतो याचे तरी भान असायला हवे.

आई नेहमी म्हणते कि मुलगा घराबाहेर पडला कि तो जोपर्यंत सुखरूप घरी पोहोचत नाही तोपर्यंत जीवात जीव नसतो. कारण हल्ली कुठे काय होईल याचा नेम नाही. आपले आई-वडील केवळ आपल्या मुलाच्या इच्छेखातर त्याला बाईक आणून देतात. कित्येकांना परवडत नसते तरीही, पण याची जाण किती तरुणांना असते ? आपल्याला घरी कुणीतरी आपली वाट बघत असल्याचे, कुणीतरी काळजी करत असल्याचे भान असेल तर मित्रांच्या नादी लागून असले जीवावर बेतणारे प्रकार नक्कीच कमी होतील.

क्रिकेट मध्ये असे बऱ्याचदा होत असते. एक चूक, एक सुटलेली कॅच, एक चुकीचा शॉट आणि मग पुन्हा मागे वळायला संधीच नाही. आपले आयुष्यही असेच असते पण आपल्याला जोपर्यंत अशा प्रसंगाला सामोरे जात नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य जाणवत नाही. क्रिकेट मध्ये किमान पुढच्या मॅच मध्ये पुन्हा खेळायला संधी मिळेल पण इथे एकदा विकेट गेली कि खेळ खल्लास...

सेहवाग मागे एका मुलाखतीत म्हणाला होता...कि बॅट्समन कितीही चांगला असला तरी त्याला आउट करण्यासाठी एक चेंडूच पुरेसा ठरतो. क्रिकेट प्रमाणेच इथेही ती एक चूकच फार महागात पडते. एक क्षण आयुष्य संपायला पुरेसा ठरतो. एक क्षण जिथे चूक-बरोबर यातील अंतर दिसेनासे होते, आपल्या सुरक्षेपेक्षा मस्तीची नशा अधिक चढते. जिथे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता पुढे पुढे जात राहतो आणि मग पश्चाताप करायला ही संधी मिळत नाही. तारुण्यात आपल्याला चांगले-वाईट, चूक-बरोबर भले ही कळत असेल पण जर ते आपल्या आचरणात आणता नाही आले तर काय फायद्याचे? अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील मॅचमध्ये विकेट गमावली तर आपल्याला पुन्हा खेळायची संधीच मिळणार नाही. सुनील गावस्कर यांनीही एका चित्रपटातील गाण्यात म्हटले आहे...हे जीवन म्हणजे क्रिकेट रे राजा...जो हुकला तो संपला!

म्हणूनच सांगावेसे वाटते आहे कि आपल्या वेगावर नियंत्रण ठेवा, आपल्या आई वडीलांनी आपल्यासाठी खूप स्वप्न पाहिली असतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यांच्या उतारवयात त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे. आयुष्य असल्या क्षुल्लक चुकांपायी गमावण्यासाठी नाही.

भारतात होणार्‍या अपघातांबद्दल माहिती देणारा एक लेख-

http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=126412:2011-01-02-18-49-36&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2

Comments

  1. छान मस्त लिहलं आहेस...

    ReplyDelete
  2. तरी बऱ्याच घाई-घाईत लिहिले...
    परीक्षा जवळ येतेय...!

    ReplyDelete
  3. World Cup च्या अनुषन्गाने चांगला विचार मांडलात. 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, चुकला तो संपला' अस काही एक गाण होत ना .. बहुध सुनील गावस्करने गायलेलं - त्याची आठवण आली.

    ReplyDelete
  4. अर्र...हा संदर्भ लिहायचा होता मला...विसरलोच...एडीट करतो आता!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  5. खरे आहे मित्रा...

    ReplyDelete
  6. धन्यवाद अमेया...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पाऊसगाणी

निषेध!निषेध!!

बालपणीचा खेळ सुखाचा