इस्टमन कलर दुनियादारी
.jpg)
बहुचर्चित दुनियादारी एकदाचा प्रदर्शित झाला. दुनियादारी ही सुहास शिरवळकर याची एक अजरामर कादंबरी आहे याची प्रथमत: सर्वांनी नोंद घ्यावी. दुनियादारी पाहून आलेल्या अनेकांना हे माहीतच नाहीये त्यामुळे दर्जा काय असतो हे त्यांना चित्रपट पाहून कळणार नाही. या चित्रपटाचे परीक्षण करायचे म्हटले तर दोन प्रकारे करता येईल- एक म्हणजे केवळ चित्रपट म्हणून व दुसरे म्हणजे कादंबरीवर आधारित चित्रपट म्हणून. पण इथे लेखकाने (म्हणजे मी) पुस्तक आधीच वाचले असल्याने चित्रपट पुस्तकावर आधारित आहे हे सत्य त्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या लेखात वारंवार चित्रपटाची पुस्तकाशी तुलना केली जाईल पण काही उपाय नाही. दुनियादारी ही कथा आहे श्रेयस, मिनू, शिरीन, दिग्या, रानी माँ, एम के आणि कट्टा गँगची. कॉलेज, मैत्री, प्रेम, विरह, संघर्ष असे नाट्यमय कथानक असल्याने साहजिकच संजय जाधव यांना दुनियादारी पडद्यावर आणावीशी वाटली त्यात काही आश्चर्य नाही पण ते तसे करताना मूळ कथानकात हवे तसे बदल करत ती सादर केली आहे. (ज्याला माध्यम बदलाची गरज असे म्हणता येईल). आणि सामान्य प्रेक्षकाने पुस्तक वाचले नसल्याने तो मूर्ख ठरतो कारण जे दाखवले ...