वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते) आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता ...