Posts

बीपी पाहावा !

Image
काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा. अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवा...

दुनियादारी ! दुनियादारी !!

Image
दुनियादारी हे एक व्यसन आहे.  दुनियादारी म्हणजे तरुणाई ! दुनियादारी म्हणजे प्रेमभंग ! दुनियादारी म्हणजे अतूट मैत्री ! दुनियादारी म्हणजे कोमेजलेले बालपण ! दुनियादारी म्हणजे नियतीने केलेली फसवणूक ! दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण ! दुनियादारी वाचून जो त्याच्या प्रेमात पडत नाही तो तरुण नाही आणि जो वयाने तरुण नसूनही त्याला ती आवडत नाही तर तो मनानेही तरुण नाही. दुनियादारीची स्वतंत्र अशी एक शैली आहे. ती स्पष्ट आणि सरळ आहे आणि ती तशी आहे म्हणून वाचक तिच्यावर प्रेम करतात. याशिवाय दुनियादारी एक काल्पनिक सत्यकथा आहे. वाचक दुनियादारी 'ढापतात', वाचनालयातून वा मित्राकडून नेलेली परत आणून देत नाहीत या अशा कारणांमुळे मी सर्वांना दुनियादारी वाचायला सुचवतो पण देत नाही. दुनियादारीने सर्वप्रथम हेच शिकवले. दुनियादारीचे कथानक नाट्यमय आहे पण नाटकी नाहीये आणि ते नसे न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कथानकातील पात्रांच्या तोंडी असणारे संवाद. लेखकाच्या म्हणण्यानुसार दुनियादारी ही एक काल्पनिक सत्यकथा असल्याने ही पात्रे कुठेही सहज आढळणारी आहेत म्हणूनच त्यांचे संवादही तितकेच खरे असणे ही कथानका...

कृष्णधवल पाने

Image
निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे... माझ्याबाबतीत असे आहे की मला कायमच इतिहासाचे किंवा आपण न पाहिलेल्या काळाचे आकर्षण आहे. विज्ञानाने माणसाला भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी दिली तरी इतिहासाने त्याला अनुभवाने आलेले शहाणपण दिले. वर्तमान हातात आहे, भविष्य तर काय येणारच आहे. पण भूतकाळ मात्र येणार नाही. भूतकाळात किंवा स्वप्नरंजनात फार काळ रमणे ठीक नसले तरी भूत आणि भविष्य या दोघांपैकी काही निवडायची वेळ आली तर मी भूतकाळात डोकावणे पसंत करेन. गतकाळाकडे प्रामुख्याने आकर्षित करणारी माध्यमे म्हणजे सिनेमे आणि छायाचित्रे. पुस्तके किंवा छापील साहित्य आपल्याला बरीच माहिती देते पण कल्पनेच्या माध्यमातून ते डोळ्यांपुढे येण्यासाठी आपण पाहिलेल्या घटनांचेच संदर्भ जुळतात. या भूतकाळाबाबत नेहमी असे वाटते की तो मुळातच अशा कृष्णधवल रंगात अस...

तिसरा वाढदिवस

Image
ब्लॉगच्या ठळक बातम्या- १. आज ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण झाली. २. नेहमीप्रमाणे यंदाही विशेष काही लेखन झाले नाही. ३. वाढत्या महागाईचा (मूक) निषेध म्हणून गेले २ महिने ब्लॉगला टाळा लावण्यात आला होता. ४. काही दिवसांपूर्वीच २०,००० वाचकांचा टप्पा ओलांडला. ५. पाठीराख्यांची संख्या वाढल्याचे लक्षात आले आहे. येत्या काळात ब्लॉग लेखन पूर्ववत सुरु राहील असे आश्वासन देण्यात येत आहे. हुकुमावरून.

मोहीम: कोथळीगड-पेठ

Image
कुठल्याही शुभ कार्यासाठी सकाळी उठायचे ठरले की लेखक महाशयांना रात्री झोप येत नाही. कोथळी गड -पेठ येथे जायचे ठरले तसे सर्व सामानासकट रात्रीच मित्राचे घर गाठले पण सर्व झोपले तरी निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होईना. चार वाजता कुठेशी थोडी झोप लागल्यासारखे वाटले तोच सहा वाजले आणि मोहीम सुरु झाली. सगळ्यांची जमवाजमव आणि ट्रेकच्या सूचनांचे कार्यक्रम झाल्यावर सात वाजता गाडी हलली. प्रवासामध्ये उत्साही मावळ्यांनी लोकगीते,पोवाडे,भजन म्हणत प्रवास सुखकर केला. आंबिवली गावाच्या पायथ्याशी १० वाजता नाश्त्यासाठी उतरलो. पोहे आणि चहा पोटात उतरवून गडाच्या दिशेने चालू लागलो. बऱ्याच दिवसांनी लेखक महाशयांनी कॅमेरा बाहेर काढल्याने फोटो सेशन जोरदार सुरु झाले. कॅमेऱ्याच्या जीवात जीव असेपर्यंत फोटो काढायचे असे ठरवून मिळेल ते क्लिकत चाललो होतो. सोबतीला नावापुरतेही उन्ह म्हणून नव्हते त्यामुळे ट्रेकसाठी वातावरण प्रसन्न होते. शिवाय इतर ट्रेकर्सप्रमाणे पाठीवर बॅग न घेता चालल्याने आम्ही बरेच बागडत होतो.   पेठ गावाचा परिसर येईपर्यंत प्रशस्त पायवाट आहे आणि त्यानंतर त्याहून प्रशस्त मैदानी प्रदेश. इथे आम्हाला फो...

आमचे क्लासेस जॉइन करा

शाळा सुरु होऊन दोन दिवस झाले होते. राणेसर त्यांच्या गणिताच्या तासासाठी 'दहावी अ'च्या वर्गात आले. इतर शिक्षकांप्रमाणे त्यांनीही सर्वांना यंदा दहावीचे वर्ष आहे आणि त्यांनी भरपूर अभ्यास करायला हवा याबद्दल सूचना दिल्या. त्याच वर्गात सोहम नावाचा विद्यार्थी होता जो गेल्या वर्षी परीक्षेत पहिला आला होता आणि गणितात तो विशेष हुशार असल्याने सरांचाही लाडका होता. आपला तास संपल्यावर राणेसरांनी त्याला शाळा सुटल्यावर भेटायला सांगितले त्याप्रमाणे तोही सर्व विद्यार्थी गेल्यावर स्टाफरूमकडे निघाला. सर त्याची वाट बघत स्टाफ रूमच्याबाहेरच उभे होते. ''काय सर, तुम्ही बोलावलं होतं मला ?'' ''हो, अरे यंदा दहावी, अभ्यास जोरदार असायला हवा या वर्षी !" "ठाउक आहे सर, सुट्टीत सुरुवात केलीये थोडी" "ते अपेक्षित होतंच मला, अभ्यास कसा चाललाय मग? " "चालू आहे...नेहमीप्रमाणे " "तू या वर्षीही क्लास लावला नाहीयेस म्हणे. गेल्या वर्षीपर्यंत ठीक होते पण आता दहावीला एक-एक मार्क किती महत्त्वाचा ठरतो माहिती आहे ना" "माहिती आहे सर...पण मला...ना...

आयपीएलचा बाजार

नाही म्हणता म्हणता आयपीएलचे पाचवे पर्वही संपले. आयपीएल सुरु झाले तेव्हा कुमार वयात असणारे आम्ही आता तारुण्यात आलो असे हल्लीच माझ्या लक्षात आले. सुरुवातीला आयपीएलच्या बाबतीत आम्ही फार काही खुश नव्हतो. पहिलेच वर्ष असल्याने फारच गोंधळ दिसत होता. एरवी भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या व्यतिरिक्त काही रंजक सामने होऊ शकतात अशी कल्पना नव्हती. आता आयपीएलचा कारभार, आयपीएल टीम्स सगळ्या अंगवळणी पडल्याने मुंबई-चेन्नई, दिल्ली-कोलकाता अशा मॅचेससुद्धा आवडीने पहिल्या जाऊ शकतात हे कळले आणि आयपीएलच्या बाबतीत कुठलीही मॅच रंगतदार होऊ शकते त्यामुळे वेडा क्रिकेटप्रेमी हौशीने सगळ्या मॅचेस पाहत बसतो. एखादे नव्या पद्धतीचे गाणे पहिल्यांदा ऐकले की कळत नाही आणि आवडतही नाही पण वारंवार ऐकून आणि बाकीच्यांना कळते आणि आवडते तर मला का नाही म्हणून आपल्याला ही आवडायला लागते तसे आयपीएलचे झाले आहे. पहिल्या वर्षी हा प्रकार काय आहे, तो राहणार की जाणार हे कळेपर्यंत स्पर्धा संपलीदेखील. आता आयपीएलला नावे ठेवणार्यांनीही हे स्वीकारले आहे आणि एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याकडे पाठह...